एटापल्ली:-तालुक्यातील अतिदुर्गम ,नक्षलग्रस्त व मागासलेल्या एकरा येथील ग्रामस्थांसोबत आविसंचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी जनसंवाद साधत परिसरातील समस्या जाणून घेतल्या.यावेळी एकरा व परिसरातील येथील ग्रामस्थांनी माजी आमदार दिपक आत्राम यांचेसमोर आरोग्य,सिंचन,रस्ते,वनहक्के दावे,शिक्षण,रोजगार असे अनेक ज्वलंत समस्या मांडल्या. एकरा व परिसरातील ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रत्येक समस्यावर तोडगा काढू,आणि एकरा सह परिसरातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे उपस्तितांना यावेळी त्यांनी ग्वाही दिली.
माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या जनसंवाद सभेला एकरा व परिसरातील गावातील ग्रामस्थांची उपस्थिती होती.
एकरा येथे पार पडलेल्या माजी आमदार आत्राम यांचे जनसंवाद सभेला माजी जि.प.सदस्य संजुभाऊ चरडुके,माजी प.स.सदस्य संगीता ताई दुर्वा,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार,माजी सरपंच साधू गावडे,पोलीस पाटील साधू दुर्वा,नानसु तिम्मा पोलीस पाटील कुद्री,माजी सरपंच दिलीप गंजीवार,संदीप बडगे,दत्तू उसेंडी,प्रमोद बडा, देऊ गावडे,मधुकर गावडे,रमेश दुर्वा,चंदू आत्राम,फकिरा गावडे,सम्मा गावडे, सह आविसंचे पदाधिकारी,कार्यकर्ते व गावकरी उपस्तीत होते.