दुसऱ्या टप्प्यातील यात्रेला मुलचेरा तालुक्यातुन शुभारंभ
मुलचेरा:-दुर्गम भागातील शेतकरी, शेतमजूर, वंचित नागरिकांचे विविध समस्या आवासून असून त्या समस्या जाणून घेऊन सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद यात्रेचा दुसऱ्या टप्प्याला 8 ऑक्टोबर पासून मुलचेरा तालुक्यातून सुरुवात करण्यात आली आहे.
संवाद यात्रेत सिनेट सदस्य तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम,राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम,माजी जि प अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, जिल्हा उपाध्यक्ष फहिम काझी,जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये,शहर कार्याध्यक्ष कपिल बागडे,मुलचेरा तालुकाध्यक्ष तथा माजी जि प बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास तालुका कार्यकारी अध्यक्ष मनोज बंडावार,राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ममता बिश्वास माजी जि प सदस्य ज्ञानकुमारी कौशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद यात्रेचे पहिल्या टप्प्याचे आयोजन 16 ते 23 सप्टेंबर दरम्यान करण्यात आले होते.या दरम्यान जिल्ह्यातील उत्तर भागातील 6 तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आले.त्या भागातही संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर दसरा आणि नवरात्र सण आटोपल्यावर लगेच अहेरी विधानसभेत संवाद यात्रेला सुरुवात झाली असून 8 ऑक्टोबर रोजी मुलचेरा तालुक्यातील गोमणी येथून हा संवाद यात्रेचा शुभारंभ झाला.यावेळी गोमनी,सुंदरनगर, श्रीनगर,विवेकानंदपूर,मल्लेरा आणि कोठारी या गावात संवाद यात्रा काढून या परिसरातील शेतकरी,शेतमजूर, वंचित आणि दुर्लक्षित नागरिकांचे मूलभूत प्रश्न व समस्या आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी जाणून घेतले.यावेळी नागरिकांनी विविध समस्या मांडले.आमदार आत्राम यांनी लगेच संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून त्वरित समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. काही समस्या वरिष्ठ पातळीवरचे असल्याने येत्या काही दिवसात त्याही समस्या सोडविण्याचे आश्वासन आमदार आत्राम यांनी दिले.
मागील दोन ते अडीच वर्षांपासून जनता दरबार,मासिक सभा,आमदार आपल्या दारी सारखे उपक्रम राबवून थेट जनतेपर्यंत जाऊन समस्या सोडविण्याचे काम सुरू असून आता परिवार संवाद यात्रेला सुद्धा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळेच संवाद यात्रा आयोजित गावातील नागरिकांनी मान्यवरांचा ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले हे विशेष.