ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

माजी राज्यमंत्री राजे अमरिशराव आत्राम यांनी केली

देवनगर येथील गंभीर रोगाने पीडिताला आर्थिक मदत

मूलचेरा:-
तालुक्यातील विवेकानंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या देवनगर येथील अंजन बिश्वास हे गेल्या एक वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने ते संकटात सापडले होते आणि त्यांना उपचारासाठी आर्थिक अडचण होती,ही बाब माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेट चे दानशूर राजे अमरिशराव आत्राम यांच्या लक्षात आली आणि त्यांनी आपल्या दानविर स्वभावाने देवनगर येथील अंजन बिश्वास या किडनी आजाराने पीडित व्यक्तीला आर्थिक मदत म्हणून 10 हजार रुपये दिले आणि पुन्हा सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सुध्दा दिले.
आपण आपल्या क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीच्या अडी अडचणीत आणि त्यांच्या संकटात त्यांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर आहोत, असे मत राजे अमरिशराव आत्राम यांनी त्यावेळी दिले,
यावेळी विवेकानंद पूर ग्रामपंचायत उपसरपंच तपन मलिक,प्रशांत बिश्वास, सुकुमार गायली,आनंद बिश्वास,परितोष सरकार,अमर दास आणि देवनगर येथील गावकरी उपस्थित होते.