मुलचेरा:-
तहसील कार्यालय मुलचेरा यांचे तहसीलदार माननीय कपिल हटकर आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे आणि नेताजीं सुभाष चंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा आणि राष्ट्रीय सेवा योजनायांच्या संयुक्त विद्यमानाने आज नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय ते तहसील कार्यालय पर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली
आपत्ती ही मानवी जीवनातील अपरिहार्य घटना आहे. ही आपत्ती नैसर्गिक व मानवनिर्मित अशा दोन प्रकारची असते. वादळे, भूकंप, अतिवृष्टी, आग इ. नैसर्गिक तर युद्ध, दहशतवादी हल्ले, दंगली इ. मानवनिर्मित आपत्ती आहेत आणि आपन सर्व मिळून समाजाला मदत केली पाहिजे असे आव्हान मा कपिल हटकर तहसीलदार यांनी केले
या रॅलीचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा गौतम वाणी यांनी केलेे
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रणजीत मंडल् यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅली सुरवात केली.
या रॅलीमध्ये महाविद्यालयातील 100 विद्यार्थी ,प्राध्यापक डॉ शनवारे, डॉ बाचेर आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला