धानोरा:-तालुक्यातिल रांगी परिसरातील शेतकर्याना सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने धानाची लागवड करताना मोठ्या प्रमाणात हलक्या धानाची पेरणी केलेली आहे. सध्या हलके धान पिक कापणीला आले. मात्र दररोज पडणाऱ्या पावसामुळे धान कापणी होवू शकत नाही.उभ्या धानपिकाला पावसाने झोडपल्याने अनेक शेतकऱ्यांचे हलके धान झोपले.दररोजच्या पावसाने बांधितिल पाणि बाहेर काढणे शक्य नसल्याने मोठ्या प्रमाणात धान्याची नासाडी होत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे .शेतकऱ्याचे हलके धान पीक हाती येण्याच्या मार्गावर असताना परतीचा पाऊस थांबता थांबत नसल्याने कापणी व बांधणीचि कामे प्रभावित झाली आहेत .मध्यम व जड प्रतीचे धानपिक निसवत आहेत. निसवा सुरू असतानाच पिकावर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी महागडी औषधी खरेदी करून फवारणी करीत आहेत .मात्र फवारणी केल्यानंतरही काही कालावधित पाऊस येत असल्याने केलेली फवारणी निरओपयोगी ठरत आहे. परिणामी रोगाची तीव्रता वाढत चालली आहे .निसर्गाच्या प्रकोपाचा दरवर्षी बळीराजाला सामना करावा लागत आहे. पीक हाती येईपर्यंत शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. तालुक्यातील काही भागात सिंचन सुविधा पुरेपूर नसल्याने व पाण्यावर शेती करावी लागते त्यामुळे अनेक शेतकरी हलक्या धानाचे उत्पादन घेतात. मात्र यावर्षी पाऊस शेतकऱ्यांच्या पिच्चा सोडत नसल्याने धान कापणी व बांधणीची कामे कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यासमोर पडलेला आहे .परतीच्या पावसामुळे उभे धान पीक खाली कोसळले आहे .परिपक्व झालेले धानपिक सडुन जात आहेत. (सुनिल तुकाराम चलाख रांगी यांच्या शेतातिल पावसाने सडत असलेले धान पिक)
Related Articles
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित
मुंबई, दि. १६ : राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार/ जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) ,शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत त्यासाठी […]
लम्पी चर्मरोग : गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण – पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती
मुंबई, दि. 5 : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आजअखेर एकूण 144.12 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 139.42 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेल्या लसीकरणाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 100 टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे […]