आपण दिवसभरात असंख्य वेबसाईट्सचा वापर करतो. काही वेबसाईट्स या सर्वांसाठी उपलब्ध असतात, तर काहींना आधी सब्सक्राइब करावे लागते. या सबस्क्राइब कराव्या लागणाऱ्या वेबसाईटचा पासवर्ड लक्षात ठेवणे अनेकांना त्रासदायक वाटते. हा पासवर्ड जर लक्षात ठेवला नाही तर दुसऱ्यांना ती वेबसाईट वापरताना तुम्हाला नव्याने लॉग इन करावे लागते. पण आता या पासवर्ड लक्षात ठेवण्याच्या त्रासापासून सुटका मिळणार आहे. यासाठी गूगलचे नवे ‘पासकी’ हे फीचर आपल्याला मदत करणार आहे. हे फीचर कसे वापरायचे जाणून घ्या.
गूगलकडुन ‘पासकी’ हे नवे फीचर लवकरच रोल आऊट होणार आहे. या फीचरमुळे वेगवेगळ्या वेबसाईट्सचे पासवर्ड लक्षात ठेऊन लॉग इन करण्याऐवजी, थेट पिन किंवा बायोमेट्रिक ऑथेंटिफिकेशन वापरून लॉग इन करता येणार आहे. हे फीचर अँड्रॉइड आणि क्रोम दोन्हीमध्ये वापरता येणार आहे. यामुळे युजर्सना सायबर हल्ल्यांपासून अधिक सुरक्षा मिळणार आहे.