ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकाच्या नुकसानीची पुर्वसुचना विमा कंपनीस द्यावे

गडचिरोली: जिल्हयात ऑक्टोबर 2022 मधील झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकाचे प्रमाणावर नुकसान झालेले आहे. योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून 72 तासाच्या आंत या बाबतची सुचना विमा कंपनीच्या Crop Insurance App, टोल फ्री क्रमांक, कंपनीच्या इ-मेल आयडी, संबंधित बँक तसेच कृषि विभागाचे कार्यालय येथे देण्यात यावी. शेतकऱ्याने नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह (विमा हप्ता भरल्याच्या पुराव्यासह) विमा कंपनीस सादर करणे आवश्यक आहे. शेतकरी विहीत नमुन्यातील अर्ज सादर करु न शकल्यास उपलब्ध माहितीच्या आधारे अर्ज सादर करु शकतो. परंतू अर्जातील उर्वरीत माहिती 7 दिवसाच्या आत विमा कंपनीस सादर करणे आवश्यक राहील. पिक नुकसानीचा पुरावा म्हणून मोबाईल फोनवरील प्रणालीव्दारे घेतलेली छायाचित्रे देता येतील.

कंपनीचे नाव- भारतीय कृषि विमा कंपनी, संपर्क तपशील- टोल फ्री क्र. : 1800 419 5004, ई-मेल : [email protected], जिल्हा/ तालुका प्रतिनिधिचे नावे पुढीलप्रमाणे आहे. 1) राकेश शंकरराव वायललवार, पदनाम जिल्हा प्रतिनिधी, मो. क्र.9404812204, तालुका- गडचिरोली. 2) श्रीनिवास सोमा गोदारी, तालुका प्रतिनिधी- 9405522223 अहेरी, 3) विशाल वसंत सपाटे, तालुका प्रतिनिधी-8275677938, आरमोरी. 4) सुरज वामनराव राऊत, तालुका प्रतिनिधी -9423366857, भामरागड. 5) संतोष श्रावण नायगमकार, तालुका प्रतिनिधी-9765629829, चामोर्शी. 6) शुभम देवराव दुधबळे, तालुका प्रतिनिधी-9763485827, धानोरा. 7) गणेश प्रकाश गोंडरालवार, तालुका प्रतिनिधी- 9404067206, एटापल्ली. 8) राहूल अरुण नंदनवार, तालुका प्रतिनिधी-9404464886, गडचिरोली. 9) प्रफुल प्रेमानंद उईके, तालुका प्रतिनिधी-9421746151, कोरची. 10) संदीप गुरुदास आत्राम तालुका प्रतिनिधी-8275848089, कुरखेडा. 11) राजेश शंकर गुंटीवार, तालुका प्रतिनिधी-9579108244, मुलचेरा. 12) रविंद्र रामय्या नासानी, तालुका प्रतिनिधी-9889529376, सिरोंचा. 13) हर्षद चंद्रकांत किरमीरे, तालुका प्रतिनिधी-7057646297, वडसा.
तालुकास्तरावर प्रत्येक तालुक्यात विमा कंपनी मार्फत तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आलेली आहे. संबंधितांशी संपर्क करुन आपल्या पिकाच्या नुकसानीची पुर्व सुचना देण्यात यावी. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी विमाधारक शेतकऱ्यांना केले आहे.
****