मुलचेरा :-शहीद वीर बाबुराव यांचे शहीद दिनी स्थानिक वीर बाबुराव शेडमाके सास्कृतिक भवन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विकास नैताम हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन नायब तहसीलदार तलांडे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी उपनगराध्यक्ष मधुकर वेलादी, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे विभागीय उपाध्यक्ष वासुदेव मडावी,पारंपरिक इलाखा ग्रामसभा चौडमपली चे अध्यक्ष कालिदास कुसनाके , प्रमुख मार्गदर्शक महेश मडावी,गजानन नैताम ,तालुका ग्रामसभा अध्यक्ष तथा नगरसेवक दिलीप आत्राम, स्विकृत नगरसेवक तथा प्राचार्य लतीफ शेख ,नगरसेवक काशिनाथ कन्नाके ,नगरसेविका सुनिता कुसनाके,प्रा प्रवीण कुमरे, नगरसेविका मनीषा गेडाम, नगर सेविका सुनिता कोकेरवार, प्रमुख मार्गदर्शक अश्विन मडावी , नगरसेवक बंडू आलाम .पोलीस पाटील उषा पेंदाम ,नगरसेवक विजय कुळमेथे , नगरसेविका सपना मडावी,नगरसेविका मंगला आलाम आदी मान्यवर उपस्थित होते .यावेळी वीर बाबुराव चौकात राष्ट्रीय शहीद वीर बाबुराव शेडमाके,राणी दुर्गावती,क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या संयुक्त तैल चित्राचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच मुलचेरा शहरातील दुर्गावती नगर, बिरसा मुंडा चौक ,कुमराम भीमू चौक. गोंडवाना चौक मार्गे नेताजी सुभाष चंद्र चौकापर्यंत काढलेल्या रॅलीत शेकडो नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते .गोंडी संस्कृती दर्शन नृत्य घेण्यात आले व सहभागी चमूना बक्षीस देऊन गौरविण्यात आले त्याचप्रमाणे जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथील प्रदर्शनात सहभागी झालेल्या वृषाली उईके या विद्यार्थिनीचा या वेळी सत्कारही करण्यात आला . या कार्यक्रमाचे संचालन रवी रवींद्र मडावी व ताराचंद परचाके यांनी केले प्रस्ताविक वासुदेव मडवी यांनी तर आभार रमेश कुसनाके यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता सांताराम मडावी, बुधाजी पल्लो . काशिनाथ आर्के,दिगंबर गावडे. किसन आलाम , गणपत मडावी, ताराचंद परचाके ,पवन आत्राम , दिनेश पेंदाम ,सुरज सिडाम, अंबादास आत्राम ,अनिल मडावी, संतोष आत्राम ,ऑल इंडिया आदिवासी एम्लॉईज फेडरेशन , ग्रामसभा तसेच वीर बाबुराव स्मारक समितीच्या पदाधिकारी ,युवक युवतींचे फार मोठे सहकार्य लाभले.
Related Articles
पीएम किसानचा चौदावा हप्ता हवाय; मग लगेच केवायसी करा केवायसी केली नसेल तर मिळणार नाही योजनेचा लाभ किसान योजना
मुलचेरा:- शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा चौदावा हप्ता जून महिन्यात देण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वी लाभार्थींना केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्यांनी केवायसी पूर्ण केली नाही, त्यांनी सेतू केंद्र, कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क करून किंवा पीएम किसान अपच्या माध्यमातून ई- केवायसी पूर्ण करावे, असे आवाहन तालुका कृषी […]
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये ॲप्रेंटिस पदाच्या 900 जागांसाठी भरती
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये ॲप्रेंटिस पदाच्या 900 जागांसाठी भरती (WCL Recruitment 2022) सुरू होत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 7 नोव्हेंबर 2022 पासून ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. *पदाचे नाव आणि जागा:* *ITI ट्रेड ॲप्रेंटिस* 1) COPA – 216 2) फिटर – 221 3) इलेक्ट्रिशियन – 228 4) वेल्डर (G&E) – 59 5) वायरमन – 24 […]
सिरोंचा तालुक्यातील रंगधामपेठा येथील कोनम कुटुंबाला माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून आर्थिक मदत..!!
सिरोंचा तालुक्यातील रंगधामपेठा येथील कोनम कुटुंबाला माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून आर्थिक मदत..!! सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत रंगधामपेठा येथील भाजपा कार्यकर्ता लक्ष्मीनारायण कोनम यांच्या पत्नीची १७/१०/२०२३ रोजी रंगधामपेठा येथे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.विशेष म्हणजे त्यांचा धाकटा मुलगा रामेश्वर वय १९ याचा रविवारी ८/१०/२०२३ सायंकाळी कालेश्वर येथे गोदावरी नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू होता.त्या दुःखातून […]