ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

वैद्यकिय शिक्षण मराठीतून घेता येणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय…

डॅाक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून (2023) महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण मराठीतून दिले जाणार असल्याची मोठी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केली.

मध्य प्रदेशमध्ये वैद्यकीय शिक्षण हिंदी भाषेतून देण्याचा निर्णय तेथील राज्य सरकारने घेतला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात मराठीतून वैद्यकीय शिक्षण सुरू केले जाणार असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.

 

मराठीतून शिक्षण ऐच्छिक
गेल्या काही महिन्यापासून वैद्यकीय अभ्यासक्रम मराठीतून तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी विविध तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेता येणार असले, तरी ते बंधनकारक नसून, ऐच्छिक पर्याय असेल. विद्यार्थ्यांना मराठीतून एमबीबीएस, आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी हे अभ्यासक्रम मराठीतून शिकता येतील.

मोदी सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार, वैद्यकीय शिक्षण प्रादेशिक भाषेतून दिले जाणार आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण मराठीतून दिले जाईल. भाषेत बदल झाला, तरी अभ्यासक्रम तोच असेल, असे महाजन यांनी सांगितले.