अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची कर्जमर्यादा 10 लाखांवरुन केली 15 लाख रुपये; कर्ज परताव्याचा कालावधी 5 वर्षांवरुन 7 वर्षांपर्यंत वाढविण्याचा निर्णय
गुजरात सरकारने 2 नोव्हेंबरला राज्यभरात दुखवटा केला जाहीर, मोरबी पूल दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 2 नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी दुखवटा
टाटा समूह करणार महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक, राज्यातील नागपूरच्या मिहान सेझ प्रकल्पामध्ये मोठी गुंतवणूक होणार
राज्यात आता 2023 पासून जानेवारी, एप्रिल, जुलै, ऑक्टोबर महिन्यांत मतदार नोंदणी करता येणार, 9 नोव्हेंबर-8 डिसेंबर 2022 दरम्यान विशेष मोहिमेअंतर्गत आगाऊ नोंदणी करता येणार
भारतात चाइल्ड पोर्नोग्राफीला प्रोत्साहन देणाऱ्या 54,000 ट्विटर अकाउंट्सवर बंदी, नवीन IT कायद्यानंतर 26 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर दरम्यान ट्विटरची कारवाई
WhatsApp ने सप्टेंबरमध्ये भारतात 26.85 लाख अकाउंटवर घातली बंदी; द्वेषयुक्त पोस्ट, चुकीची माहिती आणि खोट्या बातम्यांमुळे कारवाई
नायगाव BDD चाळीच्या विकासाचे काम 1 जानेवारीपासून सुरू, बीडीडी पुनर्विकास कार्यक्रमात एकूण 195 चाळी मिळून 15,593 सदनिका निर्माण होणार
तुळशीविवाह संपन्न झाल्यानंतर लग्न सराईला सुरुवात होणार, पंचांग शास्त्राप्रमाणे यंदा 25 नोव्हेंबर ते पुढील वर्षी 28 जूनपर्यंत एकूण 58 विवाह मुहूर्त राहणार
कार्तिक यात्रेनिमित्त पंढरपूरमध्ये मद्य विक्रीवर बंदी, सार्वजनिक शांतता राहावी यासाठी 3 आणि 4 नोव्हेंबर रोजी पंढरपूर शहरात मद्य विक्री केल्यास होणार कारवाई
अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रतिक बब्बर यांचा ‘इंडिया लॉकडाऊन’ हा सिनेमा होणार प्रदर्शित; 2 डिसेंबरला हा चित्रपट Zee5 वर प्रदर्शित होणार