मुलचेरा- नगर पंचायत चे माजी नगरसेवक प्रमोद गुट्टेवार यांची मुलचेरा तालुका काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रमोद गुट्टेवार यांची शिफारस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रशासन व संघटन सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या कडे केली होती. काँग्रेसचे प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांनी प्रमोद गुट्टेवार यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड करण्याबाबत काँग्रेसचे सरचिटणीस प्रमोद मोरे यांना पत्र दिले. त्या पत्रानुसर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले. प्रमोद गुट्टेवार यांची नियुक्ती मुलचेरा तालुका काँग्रेस साठी संजीवनी ठरणार आहे. तालुक्याची जवाबदारी दिल्याबद्दल प्रमोद गुट्टेवार यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेवराव उसेंडी, जिल्हा प्रभारी डॉ.नामदेवराव किरसान, माजी जिल्हा परिषद सदस्य व मुलचेरा काँग्रेसचे नेते रविंद्र शहा, प्रदेश सचिव डॉ.चंदाताई कोडवते, माजी पंचायत समिती सभापती व महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सुवर्णताई येमुलवार, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य शुभम शेंडे व आदींचे आभार मानले.