चामोर्शी:-भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुका काँग्रेस चामोर्शी तर्फे भारत जोडो यात्रेनिमित्त नियोजन बैठक व तालुका काँग्रेस मेळावा दिनांक 13 नोव्हेंबर ला सांस्कृतिक भवन बाजार चौक चामोर्शी येथे दुपारी ११ वाजता आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक महेंद्र ब्राह्मणवाडे अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मारोतराव कोवासे माजी खासदार तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर नामदेव उसेंडी माजी आमदार, डॉक्टर नामदेव किरसान प्रदेश सचिव, माजी आमदार आनंदराव गेडाम, चामोर्शी नगरपंचायत अध्यक्ष जयश्रीताई वायलालवार, चंदाताई कोडवते प्रदेश सचिव, रूपालीताई पंदीलवार जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी,लोमेश बुरांडे उपाध्यक्ष नगरपंचायत चामोर्शी,राजेश ठाकूर जिल्हाध्यक्ष पर्यावरण विभाग,अनिल कोठारे जिल्हा उपाध्यक्ष, नीलकंठ निकाळे ता. अध्यक्ष सरपंच संघटना, विनोद खोबे माजी तालुका अध्यक्ष, संजय वडेट्टीवार काँग्रेस नेते, माधव घरामी,निकेश गद्देवार माजी सरपंच, रवींद्र पाल तर प्रमुख उपस्थिती चामोर्शी नगरपंचायतचे काँग्रेस गटनेते तथा नगरसेवक नितीन वायलालवार, बांधकाम सभापती वैभव भिवापुरे, पाणीपुरवठा सभापती सुमित तुरे, महिला बालकल्याण सभापती प्रेमा अमोल आईचंवार, नगरसेविका वर्षा वैभव भिवापुरे, नगरसेविका स्नेहा गुरुदेव सातपुते आदी उपस्थित राहणार आहेत तरी या नियोजन बैठक तथा मेळाव्याला तालुका व जिल्हा पदाधिकारी सर्व तालुका विभाग काँग्रेस पक्षाचे सर्व सरपंच व ग्रामपंचायत सदस्य,सर्व सेवा सहकारी अध्यक्ष,सदस्य जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष प्रमोद भगत यांनी केले आहे.
Related Articles
जनावरांना लम्पी चर्मरोग मुक्त करण्यासाठी काळजी व सुश्रुषा यावर ८० टक्के भर द्यावा – पशु संवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह
बाभुळगाव, नेर, दारव्हा तालुक्यात केली जनावरांची पाहणी यवतमाळ, दि. १० जिमाका : महाराष्ट्रामध्ये लम्पी चर्मरोग हा साथरोग हाताळणे हे पशुसंवर्धन विभागासमोर मोठे आव्हान होते. मात्र पशुसंवर्धन विभागाने हे आव्हान चांगल्या पद्धतीने हाताळले. यापुढेही दोन महिने हे आव्हान हाताळण्यासाठी पशुसंवर्धन अधिकारी आणि डॉक्टरांनी जनावरांची काळजी व सुश्रुषा ८० टक्के आणि २० टक्के मेडिसिन यावर भर देऊन जनावरांना […]
उद्यापासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 31 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. 9 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने 31 जानेवारीला या अधिवेशनाचा प्रारंभ होणार आहे. मुर्मू यांचे अभिभाषण यावेळी संसदेच्या केंद्रीय कक्षात न होता नवीन संसद भवनातील लोकसभेच्या सभागृहात होणार आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने राष्ट्रपती मुर्मू यांचे यावेळी प्रथमच नवीन संसद भवनात आगमन होणार […]
पोलीस व होमगार्ड विभागाच्या कर्मचाऱ्यांचे उत्साहात मतदान
गडचिरोली १३: जिल्ह्यात ६७- आरमोरी, ६८-गडचिरोली आणि ६९-अहेरी या तीनही विधानसभा मतदारसंघात सोमवार दिनांक ११ ते बुधवार दिनांक १३ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. आरमोरी मतदार संघात 162 पैकी 158 पोलिस कर्मचाऱ्यांनी तर 175 पैकी 158 होमगार्ड कर्मचाऱ्यांनी मतदान केले. एकूण 337 […]