सर्व नागरिकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे – गूगलने आपले AutoPay सिस्टम चालू केले आहे
Google UPI द्वारे कोणत्याही सबस्क्रिप्शनसाठी पैसे भरल्यास तुम्ही ते पेमेंट आपोआप करू शकाल – त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला सबस्क्रिप्शनसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत , दरम्यान ही सुविधा फक्त गुगल प्ले स्टोअरसाठी असेल.
कसे काम करेल UPI AutoPay ?
NPCI ने UPI 2.0 अंतर्गत UPI AutoPay ची सुविधा सुरू केली असून ,या अंतर्गत युजर्स कोणत्याही UPI ऍप्लिकेशनद्वारे Auto पेमेंट करता येते.
कोणत्याही गोष्टीसाठी सबस्क्रिप्शन प्लॅन निवडल्यानंतर युजर्सना कार्टमधील पसंतीच्या पेमेंट पद्धतीवर टॅप करावे लागेल.
त्यानंतर वापरकर्त्यांना Pay with UPI वर टॅप करावे लागेल, तसेच वापरकर्ते मासिक, त्रैमासिक याप्रमाणे नियमित आधारावर पेमेंटचा पर्याय निवडू शकतात.