छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अपमान जनक व वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोशारी व भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा निषेध म्हणून मुलचेरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मुलचेरा येथे निषेध आंदोलन करण्यात आले. राज्यपाल हे संविधानिक व घटनात्मक पद असताना देखील राज्यपालाकडून छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले व राज्यातील इतरही महापुरुषांच्या विषयी नेहमी अपवादग्रस्त विधान केल्या जाते हे अतिशय निंदनीय असून भाजप नेते व सरकार मधील लोक त्यांना पाठीशी घालतात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी देखील शिवाजी महाराजांविषयी अपवादग्रस्त विधान केले.याचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र शाह, तालुका काँग्रसचे अध्यक्ष प्रमोद गोटेवार,महिला अध्यक्ष सुवर्णताई येमुलवार, युवक काँग्रेसचे अध्यक्ष शुभम शेंडे, तालुका उपाध्यक्ष सुसेन हलदार,युवक काँग्रेसचे सहसचिव निलेश ओलालवार, विनोद बानोत, वसंत बोडा,बाळु येलमुले, प्रतीक मडावी, सुधाकर गोटेवार ,अमर कोंड्रावार,ऋषी येलमुले,नयन तूनकलवार व आदी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Related Articles
गोमनी येथे शासकीय दाखल्यांची जत्रा तसेच भव्य महाराजस्व अभियान कार्यक्रय आयोजन
शेवटच्या वंचित घटकापर्यंत असलेल्या जनतेपर्यंत पोहचण्यासाठी मेळावे आवश्यक-: सर्वेश मेश्राम तहसीलदार मुलचेरा मुलचेरा-: शेवटच्या वंचित घटकापर्यंत असलेल्या जनतेपर्यंत पोहचण्यासाठी मेळावे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुलचेऱ्याचे तहसीलदार सर्वेश मेश्राम यांनी गोमनी येथे आयोजित शासकीय दाखल्यांची जत्रा तसेच भव्य महाराजस्व अभियान कार्यक्रमात केले. सदर कार्यक्रम गोमनी येथे बऱ्याच वर्षानंतर होत असल्यामुळे लोकांचा सहभाग पण तेवढाच उत्साहपूर्ण होता. सदर […]
पशुवैद्यकांनी लम्पी रोगावर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दिलेल्या सुधारित उपचार पद्धतीप्रमाणे उपचार करावेत – आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह
राज्यातील पशुधनावरील लम्पी चर्मरोगावर शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दि. 24 सप्टेंबर 2022 रोजी दिलेल्या सुधारीत उपचार प्रोटोकॉल प्रमाणे उपचार करावेत अशा सूचना पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले. श्री सिंह म्हणाले,राज्यात पशुधनाच्या लम्पी आजारावरील उपचारामुळे बाधित गावांची आणि बाधित पशुधनातही घट होत असल्याचा आलेख दाखवत आहे. महाराष्ट्रात दि. […]