पर्यावरण, डिजिटलायझेशन, व्यापार आदी विषयात भारतासोबत सहकार्य वाढवणार – राजदूत जॅन थेसलेफ
मुंबई, दि. 23 : स्वीडनचे भारतातील नवनियुक्त राजदूत जॅन थेसलेफ यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची बुधवारी (दि. २३) राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
पर्यावरणासंबंधी आव्हानांना समर्थपणे तोंड देण्यासाठी स्वीडन भारतासोबत ‘हरित संक्रमण भागीदारी’ सुरु करीत असून यासंदर्भात मुंबई येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राजदूत श्री. थेसलेफ यांनी यावेळी दिली. या भागीदारी अंतर्गत स्वीडिश कंपन्या भारतातील सिमेंट, स्टील आदी क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांना पर्यावरणपूरक तंत्रज्ञानासाठी सहकार्य करणार असून स्वीडन भारतात पर्यावरण रक्षणासह डिजिटलायझेशन, व्यापार आदी क्षेत्रांमध्ये काम करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
स्वीडनकडे पुढील वर्षी युरोपियन युनियनचे अध्यक्षपद येत आहे, तर भारत देखील २०२३ मध्ये जी २० समूहाचे अध्यक्षपद भूषविणार आहे. या पार्श्वभूमीवर उभय देशांमध्ये मुक्त व्यापार करार होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली.
स्वीडनमध्ये 50 हजार भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत असून अनेक भारतीय विविध क्षेत्रात योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.
आयकिया, एरिक्सन, एच अँड एम आदी अनेक स्वीडिश कंपन्यांचे भारतात उद्योग असून भारतासोबतचे व्यापार व वाणिज्य संबंध अधिक वाढवण्यासाठी स्वीडनमध्ये नुकत्याच स्थापन झालेल्या सरकारचे व्यापार मंत्री डिसेंबर महिन्यात भारत भेटीवर येत असल्याची माहिती राजदूत जॅन थेसलेफ यांनी राज्यपालांना दिली.
राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी राजदूतांचे स्वागत करताना उभय देशांमधील सहकार्य अधिक वृद्धिंगत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
बैठकीला स्वीडनचे मुंबईतील प्रतिनिधी एरिक माल्मबर्ग हे देखील उपस्थित होते.
*****
New Swedish Ambassador calls on Governor Koshyari
The newly appointed Ambassador of Sweden to India Jan Thesleff has said that Sweden is working closely with India on the issues of Environment, Sustainability and Digitalization. Stating that the Trade Minister of Sweden will be visiting India later during the year, he expressed the hope that the cooperation between the two countries will further grow in the coming years.
The Ambassador was speaking to Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari during a courtesy call at Raj Bhavan Mumbai on Wed (23 Nov).
The ambassador told the Governor that Sweden is launching the India – Sweden Green Transition Partnership later during the day. He said through the partnership Swedish companies will work with Indian corporates and companies across cement, iron and steel sectors and contribute to their green journeys.
The Consul of Sweden in Mumbai Erik Malmberg was also present.