महाराष्ट्र शासन अधिसूचना, ग्रामविकास विभाग क्र. व्हीपीएम-२००४/प्र.क्र.२६१/पंरा-५, दि.१९ ऑगस्ट, २००५ महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) (सुधारणा) नियम, २००५ मधील नियम क्र. १० (अ) मधील तरतुदी नुसार जिल्हा सेवा वर्ग-३ व वर्ग-४ मधील विवक्षित पंचायत कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठीची पात्रता पुढील प्रमाणे आहे.
१) ज्याने ग्रामपंचायत कार्यालयात १० वर्षाहून कमी नसेल इतकी सलग पूर्णवेळ सेवा केली असेल असा पंचायत कर्मचारी, जिल्हा सेवेतील वर्ग-३ व वर्ग-४ च्या कोणत्याही पदावरील नियुक्तीसाठी पात्र असेल, अशी नियुक्ती थेट ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून ज्येष्ठतेच्या आधारे संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल.
२) या नियमांमध्ये काहीही अंतर्भूत केलेले असले तरी, कोणत्याही जिल्हा सेवेतील वर्ग ३ व वर्ग-४ ची कोणतीही पदे, नामनिर्देशनाद्वारे भरावयाची असतील त्यावेळी जिल्हा परिषदेशी संबंधित संवर्गात रिक्त घोषित केलेल्या एकूण पदांच्या १० टक्केहून कमी नसतील इतकी पदे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून भरण्यात येतील.
२. उपरोक्त तरतुदीनुसार पात्र आहेत अशा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून भरावयाची पदे ही नामनिर्देशनाने / सरळसेवेने पदभरती करतांना जिल्हा परिषदेशी संबंधित संवर्गात रिक्त घोषित केलेल्या एकूण पदांच्या १० टक्के पेक्षा कमी नसतील इतकी पदे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून भरण्याबाबत तरतूद आहे. म्हणजेच ज्यावेळेस सरळसेवेने पदभरती करण्याची जाहिरात प्रसिध्द करण्याचा निर्णय घेतला जातो त्यावेळेस एकूण भरावयाची रिक्त पदाच्या ९० टक्के जाहिरातीद्वारे व १० टक्के ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून पदभरती करणे अपेक्षित आहे.
३. तथापि, शासनाने सर्व जिल्हा परिषदेतील गट क मधील १८ संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी माहे मार्च, २०१९ मध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. परंतू सदर भरती अद्याप होऊ शकली नसल्यामुळे मार्च २०१९ मधील १८ संवर्गाची संपूर्ण जाहिरात दि. २१ / १० / २०२२ च्या शासन निर्णयान्वये रद्द करण्यात आली आहे. शासन निर्णयामधील प्रपत्र – १ नुसार पुढील परीक्षेचे कालबद्ध कार्यक्रम (वेळापत्रक) दिलेले आहेत. त्यानुसार जानेवारी २०२३ मध्ये वर्ग क संवर्गातील आरोग्य विभागाशी संबंधित रिक्त पदांची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे.
४. तसेच, वित्त विभागाने दि. ३१.१०.२०२२ च्या शासन निर्णयान्वये ज्या विभागांचा सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम झालेला नाही. अशा विभागाच्या गट सरळसेवेच्या कोटयातील रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मुभा क मधील देण्यात आली आहे. त्यानुसार ग्रामविकास विभागाने दि. १५.११.२०२२ च्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषदांतील गट क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट-ड वगळून) रिक्त पदे संवर्गनिहाय भरण्याबाबत सुधारित कालबध्द कार्यक्रम (परिक्षेचे संभाव्य वेळापत्रक निश्चित करण्यात आलेला आहे. नविन पदभरतीची जाहिरात प्रसिध्द करण्याबाबत कार्यवाही सुरू असून (माहे डिसेंबर २०२२ अखेर पर्यंतच्या रिक्त होणारे पदे विचारात घेवून) त्यानुषंगाने ग्राम पंचायत कर्मचाऱ्यामधून १० टक्के कोटयातून संवर्गनिहाय (ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता, पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक व इतर) पदभरती करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
५. तरी, सन २०२३ मध्ये येणाऱ्या जाहिरातीत (माहे डिसेंबर २०२२ अखेर पर्यंतच्या रिक्त होणारे पदे विचारात घेवून) माहे मार्च, २०१९ मधील रद्द करण्यात आलेल्या जाहिरातीतील रिक्त पदांचा समावेश आहे. त्यामुळे सदर पदभरती करतांना सन २०२३ मध्ये येणाऱ्या जाहिरातीतील पदांच्या अनुषंगाने ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित ठेवण्यात येणाऱ्या १० टक्के कोटयातील पदांमधून सन २०१९ च्या जाहिरातीच्या अनुषंगाने भरण्यात आलेल्या १० टक्के कोटयातील पदे (पदांची संख्या) वगळून उर्वरित पदे १० टक्के ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांमधून संवर्गनिहाय (ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता, पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक व इतर) भरण्यात यावीत.
ग्राम विकास विभाग शासन निर्णय: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून १० टक्के पदे जिल्हा परिषद सेवेत भरती करण्याबाबत शासन अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा