राज्यात शेळी पालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण परसबाग शेळी विकास योजना अहिल्या शेळी योजना सुरु करून ९०% अनुदानावर १० शेळ्या व १ बोकड असा शेळीगट वाटपासाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहेत.
ग्रामीण परसबाग शेळी विकास योजना अहिल्या शेळी योजना; ९०% अनुदानावर १० शेळ्या १ बोकड:
योजने अंतर्गत देण्यात येणारे लाभ:
- उस्मानाबादी / संगमनेरी अथवा स्थानिक वातावरणात तग घरातील अशा प्रजातींच्या पैदासक्षम १० शेळ्या व १ बोकड असा शेळीगट वाटप करण्यात येईल.
- एकूण रक्कम रु. ६६०००/
- लाभार्थी साठी ९० % शासन हिस्सा ( रु ५९ , ४००/-) व १० % लाभार्थी हिस्सा ( रु. ६६००/-)
पात्रता:
- अनुसूचित जाती जमाती साठी
- दारिद्र्य रेषे खालील लाभार्थी
- अल्प भूधारक (१ ते २ हेक्टर पर्यन्त भूधारक)
- महिलां लाभार्थीनाच प्राधान्य.
- लाभधारकाचे वय १८ वर्षापेक्षा कमी व ६० वर्षापेक्षा जास्त नसावे.
- पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत गेल्या ३ वर्षामध्ये लाभ घेतलेल्या व्यक्तीस किंवा कुटुंबातील व्यक्तीस या योजनेअंतर्गत पुन्हा अर्ज करता येणार नाही.
- एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस अर्ज करता येईल.
- अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवानिवृत्ती वेतनधारक / शासकीय पदाचा लाभ घेणारा, तसेच राज्य, केंद्र शासन / स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य / पदाधिकारी / लोकप्रतिनिधी नसावा.
अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती:
- अर्ज सादर करण्याचा कालावधी १०/१२/२०२२ ते २५/१२/२०२२ पर्यंत.
योजनेची पूर्ण माहिती या अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील www.mahamesh.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे .
ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.