नागपूर :-महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ पुणे व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धनंजयराव गाडगीळ सहकार प्रबंध संस्थान नागपूर येथे तिन दिवसीय निवासी नर्सरी उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला विदर्भातील सर्व जिल्ह्यातील तालुक्यातुन प्रशिक्षणार्थी आले होते.सदर प्रशिक्षणामध्ये फळ रोपे, भाजीपाला रोपे तयार करणे, फळे भाजीपाला अभिवृद्धी, फळबाग आखणी आणि उभारणी, बागेचा आराखडा, नर्सरी उद्योगांची उभारणी आणि व व्यवस्थापन, पिकांचे पीक संरक्षण निगा आणि काळजी, नर्सरीसाठी परवाना प्रक्रिया, नर्सरीमधील सुरक्षा, व्यक्तिमत्त्व विकास, शासकीय योजनांची माहिती, प्रक्षेत्र भेटी आदी विषयांचा समावेश होता. प्रशिक्षण विनामूल्य होते. सदरचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित पुणे च्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले आहे, या कार्यशाळेत प्रमुख उपस्थितीत हेमंत जगताप, दिगंबर साबळे , रुपकुमार पगारवार,दिपक बेदरकर, प्रभाकर शिवणकर, डॉ अश्विनी गायधनी,कोनन इंद्रपाल सिंग, डॉ सिमा ठाकरे , कांतिलाल पवार,सरोज देशमुख, पुजा वासोदे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तर हा कार्यक्रम आयोजन करण्याकरिता डॉ कैलास मोते, मिलींद आकरे, डॉ आशिष जोशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत जगताप यांनी केले तर आभार हबिब शेख यांनी मानले
Related Articles
मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम साहेबांचे आभार मानावे तेवढे कमीच
अतिव दुखाःत होतो मायेचा स्पर्श! मृतदेह जपणुक करायला पुर्ण अहेरी ऊपविभागात साधन नव्हते.एवढ्या मोठ्या परिसरात केवळ एकच शितशवपेटी एका सामाजीक संस्थेकडे होती. *मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम* साहेबांना अडचण माहीत होती परंतु योग्य संस्थेला देण्याचा त्यांचा मानस होता.अहेरी ऊपविभागात समाजकार्यात अग्रेसर असलेल्या *टायगर ग्रुपला* शितपेटी प्रदान करण्यात आली.टायगर ग्रुप मार्फत ही सेवा अविरत सुरु आहे.केवळ आलापल्लीच नव्हे […]
नवीन आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयांना मंजुरीसह श्रेणीवर्धन व पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. १४ :- राज्यातील वरुड, मोर्शी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, तुमसर, पुसद, चंदगड, गडहिंग्लज, आजरा, वसमत, गंगापूर, खुलताबाद, औंढा नागनाथ, अकोले, संगमनेर, सुरगाणा, शिरूर, आंबेगाव, मंचर, बारामती, खेड, मोहोळ, अहमदनगर आदी तालुक्यातील नवीन प्राथमिक तसेच उप आरोग्य केंद्रे, उप जिल्हा रुग्णालयांना मंजुरी देण्याबरोबरच, रुग्णालयांचे श्रेणीवर्धन, पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी. रुग्णालयांना वैद्यकीय चाचणी आणि अद्ययावत उपचार यंत्रणा उपलब्ध करावी. औषधांचा पुरवठा नियमित सुरु राहील, याची दक्षता घ्यावी. रुग्णांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री […]
चेरपल्ली नाल्यावर पूल तसेच नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून द्या.. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडे चेरपल्ली येथील नागरिकांनी निवेदनातून केली मागणी.
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याकडे पाठपुरावा करून मागण्या पूर्ण करू.. राजेंनी दिली ग्वाही अहेरी नगरपंचायत क्षेत्रात समाविष्ट असलेल्या चेरपल्ली गावात सद्या विविध समस्यांना जनतेला तोंड द्यावे लागत आहे, ह्या समस्या तातडीने सोविण्याची मागणी चेरपल्ली येथील गावकऱ्यांनी एका निवेदनातून माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडे काल केले..!! चेरपल्ली नाल्यावर सद्या पूल नसल्याने अहेरी पासुन १ किमी चेरपल्लीचे […]