ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण एकात्मिक कुक्कुट विकास योजना : कुक्कुटपालन योजनेच्या अनुदानात वाढ

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत एकात्मिक कुक्कुट विकास ही योजना सन २०१० पासुन राज्यात कार्यान्वित असून, या योजनेअंतर्गत ५० टक्के अनुदानावर अंडी उत्पादनासाठी तलंगा गट (२५ तिलंगा + ३ नर कोंबडे ) वाटप व १०० एक दिवशीय सुधारित कुक्कुट पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप केले जातात.

सद्यस्थितीत उबवणीची अंडी, तलंगा, नर कोंबडे व एकदिवसीय कुक्कुट पिल्ले या सर्वांच्या किंमतीमध्ये वाढ झालेली आहे. तसेच कुक्कुट खाद्यासाठी लागणा-या कच्च्या मालाच्या किंमती, औषधी व इंधनामध्ये देखील दर वाढ झालेली असल्याने कुक्कुट खाद्य, कुक्कुट पक्षांना लागणारी औषधी व वाहतुक खर्चात देखील वाढ झालेली आहे.

या योजनेंतर्गत वाटप करावयाच्या तलंगा, नर कोंबडे व एक दिवशीय कुक्कुट पक्षी यांच्या गटाच्या आधारभूत किंमती निश्चित करुन बराचसा कालावधी झालेला असल्याने त्यात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

वर नमुद केलेली वस्तुस्थिती विचारात घेवून जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत ५० टक्के अनुदानावर अंडी उत्पादनासाठी वाटप करावयाच्या तलंगा, नर कोंबडे व एक दिवशीय कुक्कुट पक्षी यांच्या गटाच्या आधारभूत किंमतीत सुधारणा करण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण एकात्मिक कुक्कुट विकास योजना : कुक्कुटपालन योजनेच्या अनुदानात वाढ :-

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण एकात्मिक कुक्कुट विकास या योजनेंतर्गत ५० टक्के अनुदानावर अंडी उत्पादनासाठी वाटप करावयाच्या तलंगा, नर कोंबडे व एक दिवशीय कुक्कुट पक्षी यांच्या गटाच्या आधारभूत किंमतीत खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास याद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

सुधारीत दराने तलंगा गट वाटपासाठी उर्वरीत ५० टक्के रक्कम म्हणजेच रु. ५,४२०/- आणि १०० एक दिवशीय सुधारित कुक्कुट पक्षांच्या पिल्लांचे गट वाटपासाठी उर्वरीत ५० टक्के रक्कम म्हणजेच रु. १४,७५०/- लाभार्थी स्वहिस्सा राहील.

उपरोक्त प्रमाणे सुधारित दर हे आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये अर्थसंकल्पित होणाऱ्या निधीमधून राबवावयाच्या योजनेसाठी दि.०१.०४.२०२३ पासून अंमलात येतील.

आयुक्त पशुसंवर्धन, पुणे यांनी दर पाच वर्षांनी या योजनेंतर्गत वाटप करावयाच्या तलंगा, नर कोंबडे व एक दिवशीय कुक्कुट पक्षी यांच्या किमतीचा तसेच कुक्कुट खाद्य किंमतीचा आढावा घेवून दरामध्ये सुधारणा करावयाचा प्रस्ताव आवश्यक त्या समर्थनासह शासनास सादर करावा.

सदर योजनेच्या अमंलबजावणी अनुषंगाने वाचा क्र. १ येथील शासन निर्णयात नमुद मार्गदर्शक सुचनात कुक्कुट पक्षांच्या गटाच्या किंमती व्यतिरीक्त कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सदर योजनेच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी आवश्यक त्या सविस्तर मार्गदर्शक सुचना आयुक्त पशुसंवर्धन, पुणे यांनी क्षेत्रीय कार्यालयांना तात्काळ निर्गमित कराव्यात.

कृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग शासन निर्णय: जिल्हा वार्षिक सर्वसाधारण एकात्मिक कुक्कुट विकास या योजनेंतर्गत ५० टक्के अनुदानावर अंडी उत्पादनासाठी वाटप करावयाच्या तलंगा, नर कोंबडे व एक दिवशीय कुक्कुट पक्षी यांच्या गटाच्या आधारभूत किंमतीत सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.