ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

डीएड, बीएड उमेदवारांसाठी अखेर मोठी घोषणा! TAIT भरती

पाच वर्षापासून रखडलेली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता (TAIT Exam) चाचणीची प्रतीक्षा आता संपली आहे. 2017 नंतर आतापर्यंत 5 वर्षे उमेदवार प्रतिक्षेत असताना आता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेची अखेर घोषणा झाली आहे. राज्य परीक्षा परिषदेकडून तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

 राज्यातील तीन लाखाहून अधिक डीएड-बीएड धारक आणि 54 हजार पात्र शिक्षक या अभियोग्यता चाचणीसाठी प्रतिक्षेत असतांना आता परिषदेकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

 22 फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023 या दरम्यान ऑनलाईन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत असल्याचे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 8 फेब्रुवारी आहे.

 *वेळापत्रक:*

◆ ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी – 31 जानेवारी 2023 ते 8 फेब्रुवारी 2023
◆ परीक्षा शुल्क भरण्यासाठी कालावधी – 8 फेब्रुवारी 2023 रात्री 11. 59 वाजेपर्यंत.
◆ प्रवेशपत्र ऑनलाईन मिळण्याचा कालावधी- 15 फेब्रुवारीपासून 2023 पासून.
◆ ऑनलाईन परीक्षेच्या तारखा – 22 फेब्रुवारीपासून ते 3 मार्च 2023 पर्यंत.

(उमेदवार संख्येनुसार किंवा इतर कारणाने वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे.)