ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

पशुसंवर्धन विभागाअंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनेचे कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करणे बाबत सूचना

पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत सन २०२२-२३ या वर्षासाठी नाविन्यपूर्ण योजना आणि जिल्हास्तरीय योजना याअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवडीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत संपुष्टात आलेली आहे. महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, कटकमंडळे या कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना उपरोक्त योजना लागू नाहीत. केवळ ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवाश्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.

सन २०२१-२२ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची प्रतिक्षाधीन यादी यादी पुढील ५ वर्ष ग्राह्य म्हणजेच सन २०२५-२६ पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल. सन २०२१ – २२ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना प्रतिक्षाधीन यादी प्रमाणे सर्वप्रथम लाभ देण्यात येणार आहे याची कृपया नोंद घ्यावी. त्यानंतर सन २०२२ – २३ पासून प्रत्येक वर्षी नविन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची यादी त्यापूर्वीच्या प्रतिक्षाधीन यादीतील शेवटच्या अर्जदारानंतर ग्राहय धरण्यात येईल.

सन २०२२ – २३ मधील अर्जदार लाभार्थ्यांना देण्यात येणारा लाभ हा त्यांचा यादीतील ज्येष्ठता क्रमांक आणि उपलब्ध निधीच्या अधिन राहून देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी दि. २३/०१/२०२३ ते दि. ११/२/२०२३ या कालावधीमध्ये “कागदपत्रे अपलोड करा” या ठिकाणी आपली कागदपत्रे अपलोड करावीत.

कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनाच फक्त “QP-EVDTEC” या नावाने SMS प्राप्त होतील. इतर लाभार्थ्यांची नावे प्रतीक्षाधीन यादीमध्ये समाविष्ट होतील. त्यांना त्यांचा यादीतील ज्येष्ठता क्रमांक आणि उपलब्ध निधीच्या अधिन राहून पुढील ५ वर्षामध्ये लाभ देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी कृपया अचूक आणि योग्य कागदपत्रे अपलोड करण्याची खबरदारी घ्यावी.

योजने अंतर्गत अंतिम निवड झाल्यानंतर बंधपत्र लाभार्थीने देणे बंधनकारक राहील. योजने संदर्भात अधिक माहिती करिता योजनेचा तपशील आणि वेळापत्रक पहावे.

कागदपत्र अपलोड करण्यापुर्वी महत्वाच्या सूचना:

1. महत्वाची सूचना – कागदपत्र अपलोड क्षमता १०० के.बी. पर्यंत असावी, “jpg, JPG, jpeg, JPEG, png, PNG” या प्रकाराचे निवडावे या प्रमाणात असावी.

2. अर्जं प्रतीक्षाधीन ठरल्यानंतरच कागदपत्र विहीत वेळेतच कागदपत्रे अपलोड करता येतील.

3. अर्जदार नोंदणीच्या वेळेस देण्यात आलेल्या आधारकार्ड नंबर व पासवर्ड भरून लॉगिन करा या बटन वर क्लिक करणे.

4. “निवडा” या बटन वर क्लिक करून कागदपत्र अपलोड करावीत.

5. कागदपत्र अपलोड करताना फाइल निवडून घ्यावी व save करण्यापूर्वी शेजारी दिलेल्या विंडो मध्ये अपलोड केलेल्या कागदपत्राची खात्री करून नंतरच save करावी.

6. कागदपत्र जतन करण्यापुर्वी ते योग्य आहेत याची खात्री करून घ्यावी.

7. योजनेच्या लाभार्थी निवडीच्या निकषनुसार, अपलोड केलेल्या कागदपत्रा व्यतिरिक्त अनुषगिक अतिरिक्त कागदपत्राची मागणी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिति / संबधित पशूसवर्धन अधिकारी यांनी केल्यास ती कागदपत्रे उपलब्ध करून देणे लाभार्थ्यास बंधनकारक आहे.

८. सर्व लाभार्थ्यांना कळविण्यात येत आहे की लाभार्थ्यांच्या सुलभतेसाठी पासवर्डचे धोरण बदलण्यात येत आहे. लाभार्थ्यांचा युजरनेम (Username)पूर्वीप्रमाणेच आधारकार्ड क्रमांक राहील पासवर्ड लाभार्थ्यानी योजनेसाठी अर्ज भरताना अर्जात उल्लेख केलेल्या बँक खातेक्रमांकाचे शेवटचे ६ आकडे राहील याची कृपया नोंद घ्यावी.

पशुसंवर्धन विभागाची अधिकृत पोर्टल: https://ah.mahabms.com/

पशुसंवर्धन विभागाचे अधिकृत अप्लिकेशन: पशुसंवर्धन – AH – MAHABMS

संपर्क:

योजनेबाबत अधिक माहितीसाठी टोल फ्री/संपर्क क्रमांकावर अधिक माहिती घेता येणार आहे. टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी ( विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

  • कॉल सेंटर संपर्क – १९६२ (१०AM to ६PM).
  • टोल फ्री संपर्क -१८००२३३०४१८ (८AM to ८PM).

संपर्क: योजने संदर्भात अडचण असल्यास आपल्या जिल्ह्यातील जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्याशी संपर्क साधण्यासाठी इथे क्लिक करा.