गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र राज्य विदर्भ

मुलचेरा येथे दोन केंद्रातील ४४ विद्यार्थ्यांची बुध्दीगुणांक चाचणी शिबीर सपन्न

जिल्हा परिषद गडचिरोली व जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली यांच्या सयुक्त विद्यमाने
मुलचेरा तालुक्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुलचेरा आणि गांधीनगर अशा ०२ केंद्रावर एकुण ४४ विद्यार्थ्यांची बुदयांक तपासणी, निदान शिबीर व स्वच्छ मुख अभियानाचे आयोजन करण्यात आले.

जिल्हा परिषद समावेशीत शिक्ष समग्र शिक्षा गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय व मित्र फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटातील बौध्दिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी स्वावलंबन ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग प्रमाणपत्र तसेच यूडीआयडी कार्ड देण्यासाठी मुलचेरा तालुक्यातील गट साधन केंद्र मुलचेरा व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विवेकानंदुर, गांधीनगर केंद्रातील विद्यार्थ्यांची दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ रोजी बुद्ध्यांक तपासणी व निदान शिबीर विशेष मोहीम मानसोपचार तज्ञ श्री उमेश कुळमेथे श्रीमती देवयानी चोपडे, श्रीमती वृषाली विभूते, श्रीमती स्फूर्ती वाडीभस्मे, श्री शशीकांत शंकरपुरे, श्री निलेश चहांदे श्रीमती श्रध्दा कोरडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. प्रसंगी पंचायत समिती मुलचेराचे गट विकास अधिकारी श्री लुमदेव बाजीराव जुवारे, गटशिक्षणाधिकारी श्री गौतम मेश्राम कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ अभिजित राऊत, यांनी शिबिराला भेटीदरम्यान उपस्थित राहुण तपासणी कक्ष, बैठक व्यवस्था,पिण्याचे पाणी व इतर महत्वाच्या सुविधांची पाहणी केली. दरम्यान शिबीरात उपस्थित मान्यवरांनी पालकांशी व विद्यार्थ्याशी हितगुज साधून शिबिरातील सोई सुविधांबाबत समाधान व्यक्त केले.सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांप्रती संवेदनशीलता बाळगून उत्तम सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मुलचेरा केंद्राचे केंद्र प्रमुख श्री प्रकाश माकोडे, गांधीनगर केंद्राचे केंद्र प्रमुख श्री भाऊराव निखाडे समावेशित शिक्षण जिल्हा समन्वयक श्री संजय नांदेकर, श्री भाऊराव हुकरे गट साधन केंद्र मुलचेरा येथील गट समन्वयक श्री विलास श्रीकोंडावार आयईडीचचे विशेष तंज्ञ श्री राजेश नागपुरकर, संसाधन शिक्षक श्री संजयकुमार मोरघडे विषय साधनव्यक्तीब श्री अमर पालारपवार, श्री अशफाक शेख, श्री राजेश कुंदोजवार,कु.विद्या भोयर, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री मंडल सर श्री महेश मडावी सर तसेच गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. दोन्ही केंद्राच्या परीसरातील जिल्हा परीषद व खासगी शाळेतील शिक्षकवृंद पालक उपस्थित होते.