गडचिरोली: राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 10 ते 20 फेबुवारी 2023 दरम्यान चामोर्शी व आरमोरी या दोन तालुक्या हत्तीरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत सामुदायिक औषधोपचार मोहीम आरोग्य कर्मचार्यांमार्फत खाऊ घालण्यात येत आहे. वरील दोन्ही तालुके हत्तीरोग जोखीमग्रस्त असल्याने त्याचा संसर्ग रोखण्यासाठी हि मोहीम राबविली जात आहे. 100 टक्के लोकांना गोळ्या खाऊ घालण्याच्या दृष्टीकोनातून आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी टीम द्वारे दिवस पाळीत किवा रात्रो पाळीत जेवण झाल्यानंतर शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत, अंगणवाडी व कार्यालये इत्यादी ठिकाणी बूथ चे नियोजन व गावोगावी गृहभेटी द्वारे गोळ्या खाऊ घालण्यात येत आहे. सामुदायिक औषधोपचार मोहीमेत आत्तापर्यंत वरील दोन तालुक्यात 83.32 टक्के लोकांनी गोळ्या सेवन केल्या आहेत. स्वत: जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आरोग्य कर्मचार्यांना सर्व नागरिकास गोळ्या खाण्याचे आवाहन केले आहे. गोळ्या सुरक्षित असून ते सेवन करणे हा हत्तीरोग संसर्ग रोखण्याचा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी कळविले आहे. हत्तीरोग दूरीकरणाकरिता चामोर्शी व आरमोरी तालुक्यात 10 ते 20 फेबुवारी या कालावधीत 3 दिवस शाशकीय सुट्या आल्याने गोळ्या खाऊ घालण्याचे उदिष्ट पूर्ण होऊ शकलेले नाही त्यामुळे सदर मोहिमेचा कालावधी दिनांक 25 फेबुवारी 2023 पर्यंत वाढवून 100 टक्के लोकांना गोळ्या खाऊ घालून उदिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना मा. सहसंचालक, आरोग्य सेवा, पुणे यांनी दिलेले आहे वरील दोन्ही तालुक्यातील ज्या लोकांनी गोळ्या सेवन केले नाहीत त्यांनी या मोहीम कालावधीत गोळ्या सेवन करावे व हतीरोगाचे उच्चाटन करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक यांनी केले आहे.
Related Articles
(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये ‘पदवीधर अप्रेंटिस’ पदाच्या 102 जागांसाठी भरती
BPCL, Bharat Petroleum Corporation Ltd – BPCL Recruitment 2022 (BPCL Bharti 2022) for 102 Graduate Apprenticeship Posts at Kochi Refinery. Total: 102 जागा पदाचे नाव & तपशील: पदाचे नाव शाखा/विषय पद संख्या पदवीधर अप्रेंटिस केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रिकल/IT/कॉम्प्युटर सायन्स/सेफ्टी/ इंस्ट्रूमेंटेशन/मेकॅनिकल/मेटलर्जी 102 Total 102 शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी. [SC/ST/PWD: 50% गुण] (2020, 2021 & 2022 दरम्यान उत्तीर्ण […]
जय माँ काली फुटबॉल क्लब देवनगर तर्फे भव्य फुटबॉल स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न..!!
माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून (27777/- रुपये) विशेष पारितोषिक. क्रीडा संमेलन ग्रामीण भागात आयोजित करणे गरजेचे- माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे मूलचेरा तालुक्यातील विवेकानंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या देवनगर येथे जय माँ काली फुटबॉल क्लब तर्फे भव्य फुटबॉल स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न झाल, त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे […]
‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ निवड समितीची पुनर्रचना
मुंबई, दि. 30: सांस्कृतिक क्षेत्रात विशेष लक्षणीय कार्य करणाऱ्या कलावंतांना ‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. या सांस्कृतिक पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या समितीमध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री हे अध्यक्ष, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव हे सदस्य तर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे सदस्य सचिव असतील. तसेच नाटक या कलाक्षेत्रासाठी सतिश पुळेकर, कंठसंगीतासाठी […]