मुलचेरा येथील स्व. श्री. मल्लाजी आत्राम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मुलचेरा या महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे उदघाटन श्री. मनोजभाऊ बंडवार उपसरपंच ग्रा. पं. कोठारी यांच्या हस्ते दिनांक 27/02/2023 रोजी पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. पी. एल. ढेंगळे उपस्थित होते. प्राचार्य ढेंगळे 31 जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून सौ. प्रगतीताई बंडावार माजी उपसभापती पं. स. मुलचेरा, श्री. रवींद्रजी झाडें माजी उपसरपंच ग्रा. पं. कोठारी, श्री. याकूबजी बानोत, श्री. पत्रुजी कोडापे, श्री. बंडुजी आलाम नगरसेवक मुलचेरा, प्रा. नितेश बोरकर, प्रा. दीपक सहारे, श्री. नितेश झाडें, श्री रुपेश वाग्दरकर, श्री. कमलेश निमगडे, श्री. आदित्य चिप्पावार, श्री. राकेश नासानी, श्री. भाऊजी रापंजी, कु. विद्या देठे तसेच रासेयो स्वयंसेवक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमरदीप रामटेके तर आभारप्रदर्शन प्रा. राष्ट्रपाल गायकवाड यांनी केले.
Related Articles
रुग्णालयात रात्री डॉक्टर उपस्थित नसल्यास थेट निलंबन; पदभार स्वीकारताच मुंढेंचा धडाका
पुणे : तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वी आयुक्त आरोग्य सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आरोग्य भवन येथील कार्यालयात डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडून मुंडे यांना तो देण्यात आला आहे. राज्यातील जनतेला आरोग्य सेवा सहज उपलब्ध करुन देण्यासाठी कटीबध्द राहण्याच्या सूचना त्यांनी त्यावेळी दिल्या होत्या. त्यांनतर आरोग्य विभागाचा आयुक्त पदाचा चार्ज घेताच आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढेच्या कामाचा धडाका सुरू असल्याचे दिसून आले आहे. […]
प्रशिक्षणाकरीता सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना प्रशिक्षण करण्याबाबत अर्ज आमंत्रित
गडचिरोली दि.14: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली मार्फत जिल्हा नियोजन समिती अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 2022-23 करीता पुढील प्रमाणे प्रशिक्षण आयोजित करण्यांत आलेले असून प्रशिक्षणाकरीता सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना सदरचे प्रशिक्षण करण्याबाबत अर्ज आमंत्रित करण्यांत येत आहे. सदरचे प्रशिक्षण हे निशुल्क आहे. सदर प्रशिक्षणाकरीता किमान शैक्षणिक अर्हता इयत्ता -5 वी […]
श्रीमद् राजचंद्रजी यांनी आत्मकल्याण मार्गातून मानवतेची सेवा केली – उपराष्ट्रपती जगदीप धनखड
उपराष्ट्रपतींच्या हस्ते मुंबईत श्रीमद् राजचंद्र स्मारकाचे अनावरण व मार्गाचे नामकरण संपन्न मुंबई, दि. २७ : भारत हा संस्कृतीचा केंद्रबिंदू असून जगभरात भारताची ओळख ही या संस्कृतीमुळे असून हा वारसा टिकविण्यात, वाढविण्यात देशातील अनेक संत महापुरुषांचा हातभार आहे. प्रत्येक कालखंडात या संतांनी या भूमीला पवित्र करण्याचे काम केले असून त्यामध्ये श्रीमद् राजचंद्रजी यांचाही समावेश आहे. श्रीमद् राजचंद्रजी […]