एकच मिशन जुनी पेंशन
चामोर्शी :- “पेन्शन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची” “एकच मिशन जुनी पेन्शन” हा नारा यावेळी देण्यात आला. अनेक कर्मचाऱ्यांनी जे 2005 नंतर सेवेत कार्यरत आहेत परंतु सरकारने अजूनही त्यांना जुनी पेन्शन लागू केलेली नाही. यावेळी राज्यातील नगरपरिषद नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या नाकर्तेपणाला दोष देत त्यांचा धिक्कार केला. व पुढे म्हणाले की आमदार – खासदाराची पेन्शन व मानधन याचा कोणताही जीआर न निघता किंवा चर्चा न होता सहज लागू होऊ शकते परंतु आपल्या आयुष्याची 25-30 वर्षे सेवेसाठी देणाऱ्या कर्मचाऱ्याला मात्र वीस – तीस हजाराच्या पेन्शनसाठी सतत लढा द्यावा लागतो ही फार लाजिरवाणी बाब असल्याचे मत या संपामध्ये मत व्यक्त करण्यात आले. तद्नंतर मुख्याधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी निखिल कारेकर, भारत वासेकर, विजय पेद्दीवार, रमेश धोडरे, श्रीकांत नैताम, बाळा धोडरे, प्रभाकर कोसरे, संतोष भांडेकर, दिलीप लाडे, सुभाष कणकुंटलावार, सोनी पिंपरे, रितिक खंडाळे, उमाजी सोमनकर आदी कर्मचारी उपस्थित होते.