वर्धा : संपाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यव्यवस्था कोलमडू नये म्हणून प्रशासन सतर्क झाले आहे. सेवाग्रामचे कस्तुरबा रुग्णालय व सावंगीचे विनोबा भावे रुग्णालय दिमतीला घेत प्रशासनाने संपकर्त्यांना चोख उत्तर देण्याचा प्रयत्न चालविला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पराडकर यांच्याकडून आरोग्य विषयक कारभाराचा आढावा घेताना संप लांबल्यास काय करता येईल याबाबत चर्चा केली. आरोग्य कर्मचारी संपावर असल्याने रुग्णांची गैरसोय होऊ न देण्याबाबत दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली.फारसा फरक पडला नसल्याचे दिसून आले. खासगी रुग्णालयांनाही सतर्क करण्याची सूचना झाली. सावंगीचे डॉ. उदय मेघे व डॉ. अभय गायधने यांनी सर्व ती तयारी असल्याचे स्पष्ट केले. तसेच सेवाग्रामच्या डॉ. पूनम वर्मा यांनीही समर्थ असल्याचे स्पष्ट केल्याने प्रशासनाचा जीव भांड्यात पडला. संप लांबल्यास संभाव्य अडचणी दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे ठरले. शासकीय आरोग्य केंद्रांना काही तुटवडा भासल्यास सेवाग्राम व सावंगीचे वैद्यकीय मनुष्यबळ तत्पर असल्याची खात्री मिळाली. जिल्हाधिकारी कर्डीले यांनी यासोबतच दोन्ही रुग्णालयास जिल्हाभर आरोग्य शिबिरे घेण्याची सूचना केली. एकूणच संपावर योग्य तो तोडगा तयार ठेवण्यात प्रशासन हालचाल करीत असल्याची घडामोड आहे.
Related Articles
लाभार्थी उद्योजकांच्या व्यवसायांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई, दि. 16 : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्योजकांच्या व्यवसायाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. नवउद्योजकांना त्यांच्या फूड व्हॅन आणि प्रवासी टॅक्सीच्या चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आल्या. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह आदी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र […]
शेळी मेंढी पालन व्यवसायातून आर्थिक समृद्धी
राज्यात शेळी मेंढी पालन व्यवसायास गती देण्यासाठी शासन स्तरावरून विविध कार्यक्रम राबविले जातात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे यात महत्वाचे योगदान आहे. या महामंडळाची स्थापना ८ ऑगस्ट १९७८ रोजी झाली. पशुसंवर्धन विभागाचे ९ मेष पैदास प्रक्षेत्रे व १ लोकर उपयोगिता केंद्र आणि १ शेळी मेंढी पैदास प्रक्षेत्र १ एप्रिल १९८४ पासून आणि […]
युवा खेळाडूंनी देशाचे नाव उज्ज्वल करावे – क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन
महाराष्ट्राचा महासंकल्प मिशन वर्ल्ड कप मुंबई, दि. 15 : जर्मनी येथे प्रशिक्षणासाठी निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांनी देशाचे नाव उज्ज्वल करावे अशा शुभेच्छा क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी दिल्या आहेत. मुंबई येथे एम सी ए क्लब येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जागतिक दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासन आणि एफ सी बायर्न […]