गडचिरोली:- सन 2023-24 या शैक्षणिक सत्रात प्रवर्गातून व्यावसायीक पाठयक्रमात राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ज्या वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यांनतर वैधता प्रमाणपत्राबाबत सामान्यत: 3 ते 5 महिन्याचा आत समिती निर्णय घेते. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव विद्यार्थ्यांनी 12 वी विज्ञान शाखेतील प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यानी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव विहीत नमून्यात (ऑनलाईन) अर्ज आवश्यक दस्ताऐवज MH-CET, JEE, NEET, B.ED CET, M.ED CET, LLB CED, B.SC AGRI CET, व MBA CET या सारख्या इतर प्रवेश पात्रता परीक्षकरीता भरण्यात आलेल्या अर्जाची प्रतीसह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आय.टी.आय.चौक, एल.आय.सी. रस्ता, कॉम्पलेस,गडचिरोली, या कार्यालयात उपस्थित होऊन सादर करावे. असे आवाहन उपायुक्त देवसूदन धारगावे यांनी केले आहे.
Related Articles
अर्थव्यवस्थेला गती, युवकांना नोकऱ्या ही शासनाची प्राथमिकता – राज्यपाल रमेश बैस
शेतकरी कर्जमुक्ती, आपला दवाखाना योजना, रोजगार मेळावे, पायाभूत सुविधांची निर्मिती यासह अनेक योजनांना राज्यात गती अर्थसंकल्पीय अधिवेशन मा.राज्यपाल अभिभाषण : मुंबई, दि. २७ :- महाराष्ट्र हे देशातील एक अग्रगण्य राज्य आहे. राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत अनेक योजना, उपक्रम राबविण्यात येत असून १ लाख २५ हजार रोजगार निर्मितीसाठी ४५ कंपन्यांशी सामंजस्य करार केले आहेत. अल्पमुदतीच्या […]
लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात ४ हजार २२१ पशुपालकांच्या खात्यांवर १०.८५ कोटी रुपये जमा
मुंबई, दि. १० : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा ४ हजार २२१ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. १०.८५ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. राज्यात आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या ४ हजार २२१ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. १०.८५ […]
*हत्तींनंतर रानगव्यांचा धुडगूस; रबी धान केले बुंध्यापासून फस्त, शेतकऱ्यांचे नुकसान*
गडचिरोली: देसाईगंजच्या पूर्वेकडील भागात वाघांची दहशत अजूनही कायम आहे. सोबतच रानटी हत्तींच्या कळपाने शेतकऱ्यांसह वनविभागास सुद्धा जेरीस आणले आहे. हत्तींची दहशत कायम असतानाच आता १२ ते १३ च्या संख्येत असलेला रानगव्यांचा कळप देखील शेतातील धान पिके बुंध्यापासून फस्त करीत आहे. शुक्रवार ८ फेब्रुवारी रोजी पिंपळगाव- विहीरगाव जंगलपरिसरातील पिके रानगव्यांच्या कळपाने फस्त केली. पिंपळगाव- विहीरगाव जंगलाला […]