माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी घेतले विविध ठिकाणी आशीर्वाद
मुलचेरा- तालुक्यात बंगाली बांधव मोठ्या संख्येने असल्याने अनेक ठिकाणी विविध सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.आता बासंती पूजा सुरु असून दरवर्षी सदर उत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो.बासंती पूजा निमित्त माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी विविध गावांत भेटी देऊन पूजन करत आशीर्वाद घेतले.
तालुक्यात दरवर्षीच बासंती पुजा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 27 मार्च रोजी शष्टी पुजा करून घटस्थपण करण्यात आली.त्यानंतर सप्तमी,अष्टमी,नवमी आणि दशमी असे 31 मार्च पर्यंत पाच दिवस पूजापाठ करण्यात आली.यादरम्यान विविध ठिकाणी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ऑर्केस्ट्रा,नृत्य,बाबूल गांन अश्या विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.31 मार्च रोजी माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी मथुरानागर,सुंदरनगर आणि गणेशनगर येथे सुरू असलेल्या बासंती पूजेत सहभागी होत देवीचे दर्शन घेतले आणि पूजन करून आशीर्वाद घेतला, तसेच यावेळी पूजा कमिटी तर्फे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
तसेच मूलचेरा तालुक्यातील या ठिकाणी बासंती पूजा,भागवत कथा,काली पूजा,विश्वकर्मा पूजा,आदी पूजा मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.यावेळी अहेरीचे राजकुमार अवधेश बाबा आत्राम,तालुका अध्यक्ष प्रकाश दत्ता,उपाध्यक्ष विजय बिश्वास, उपसरपंच तपन मल्लिक,जिल्हा सचिव सुभाष गणपती, शिवसेना तालुका अध्यक्ष गौरव बाला,ग्रा. सदस्य बादल शाह,किशोर मल्लिक मूलचेरा तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.