राज्यातील अनाथ मुलांना शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये एक टक्का समांतर आरक्षण लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामध्ये १८ वर्ष पूर्ण होण्याआधी दोन्ही पालक गमावलेली मुलं नोकरीसाठी पात्र असतील अशी घोषणा राज्य सरकारने केली.
पहा आणखी काय सांगितले राज्य सरकारने
राज्य सरकारने दिलेल्या माहिती नुसार, अनाथांसाठी नोकऱ्यांमधील आरक्षण एकूण रिक्त पदांच्या संख्येवर आणि प्रवेशासाठी खुल्या जागांच्या संख्येवर आधारित दिलं जाईल. त्यामध्ये अनाथ मुलांना दोन समान भागात विभागले जाईल.
जसे एक अनाथाश्रम किंवा सरकारी संस्थांमध्ये नोंदणी केलेले व दुसरे सरकारी संस्थांच्या बाहेर किंवा नातेवाईंकानीं सांभाळण्यात आलेली मुलं. अशा दोन भागांत विभागणी केली जाईल. दरम्यान हि विभागणी कशी होणार हे आपण येणाऱ्या मॅसेज मध्ये जाणून घेऊ.