मुलचेरा-: तालुका महसूल प्रशासन च्या वतीने गोमणी येथे भगवंतरावं माध्यमिक आश्रम शाळेमध्ये दिनांक 20 एप्रिल ला शासकीय योजनांची जत्रा तसेच महाराजस्व अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरात जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, अल्पभुधारक प्रमाणपत्र, शेतकरी दाखले, भूमिहीन दाखले, उत्पन दाखले, आयुष्यमान भारत कार्ड, श्रम कार्ड, राशन कार्ड, जेष्ठ व्यक्ती प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्रांचे वितरण होणार आहेत.सदर शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्र सुंदरनगर च्या वतीने रुग्ण तपासणी व मोफत औषधोपचार होणार आहे व त्याचप्रमाणे तालुका स्थरावरील सर्व शासकीय विभागामार्फत शिबिरस्थळी स्टाल लावून विविध शासकीय योजनांची जनजागृती तसेच प्रत्यक्ष लाभ देण्याचे काम करण्यात येणार आहे. तरी सदर शिबिराला जास्तीत जास्त संख्येने लोकांनी उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आव्हाहन मुलचेऱ्याचे तहसीलदार सर्वेश मेश्राम, नायब तहसीलदार राजेंद्र तलांडे, मंडळ अधिकारी युवराज भांडेकर गोमणी चे तलाठी रितेश चिंदमवार यांनी केले.
Related Articles
डोळयांचा लेन्स (Contact Lense) विक्री परवान्याबाबत सुचना
गडचिरोली: गडचिरोली जिल्हयातील सर्व डोळयांचा लेन्स (Contact lense) चष्मे विक्रेता यांनी अन्न व औषध प्रशासन गडचिरोली या कार्यालयात अर्ज सादर करुन विक्री परवाने घेण्यात यावे. असे आवाहन अनुज्ञप्ती प्राधिकारी व सहायक आयुक्त औषधे,अन्न व औषध प्रशासन गडचिरोलीचे,नीरज व्ही.लोहकरे यांनी केले आहे.
(SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2023
Staff Selection Commission Combined Graduate Level Examination 2023, SSC CGL Recruitment 2023 (SSC CGL Bharti 2023) for Group B & Group C Posts (Assistant Audit Officer, Assistant Accounts Officer, Assistant Section Officer, and other Posts) परीक्षेचे नाव: SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2023 Total: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही. पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव 1 असिस्टंट […]
विद्यापीठांनी आत्मनिर्भरतेचा संकल्प करावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. 24 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ ही संकल्पना मांडून भारताला सशक्त करण्यासाठी मोठे अभियान हाती घेतले आहे. प्रत्येक विद्यार्थी आत्मनिर्भर झाला तर देश आत्मनिर्भर होईल म्हणून या अभियानाला चालना देण्यासाठी विद्यापीठाने आत्मनिर्भर विद्यापीठ होण्याचा संकल्प करावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. राजभवन येथे राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाची […]