ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत लगाम येथे 11 तारखेला भव्य महाराजस्व अभियान कार्यक्रमाचे आयोजन

मुलचेरा-: शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत लगाम येथे शहिद बिरसा मुंडा ज्युनिअर कॉलेज मध्ये दिनांक 11 तारखेला भव्य महाराजस्व अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर शिबिराला उदघाटक म्हणून गडचिरोली – चिमूर लोकसभा निर्वांचान क्षेत्राचे खासदार श्री अशोकजी नेते, सह उदघाटक म्हणून अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री धर्मरावबाबा आत्राम, कार्यक्रमाचे अध्यक्ष चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी ऊत्तमराव तोडसाम, प्रमुख पाहुणे म्हणून मुलचेऱ्याचे तहसीलदार सर्वेश मेश्राम, परिवीक्षाधीन तहसीलदार करिष्मा चौधरी, संवर्ग विकास अधिकारी जुआरे, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील,गट शिक्षणअधिकारी गौतम मेश्राम,युवराज लाकडे कृषी अधिकारी पंचायत,लगाम चे सरपंच दिपक मडावी, चुटूगुंटा च्या सरपंचा साधना मडावी, येल्ला च्या सरपंचा सोयाम, कोठारीच्या रोशनी कुसनाके, शांतीग्रामा च्या सरपंचा अर्चना बैरागी आदी मान्यवर उपस्थित राहून शिबिराला मार्गदर्शन तसेच विविध प्रमाणपत्र शासकीय योजनेचे वितरण करणार आहेत. शिबिरात ग्रामीण रुग्णालय मुलचेरा, प्राथमिक आरोग्य केंद्र लगाम यांचे वतीने नागरिकांची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कृषी विभाग, पंचायत समिती, वनविभाग, एकात्मिक बालविकास प्रकल्प, आदिवासी विकास विभाग,महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना विभाग, पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार विभाग, निवडणूक विभाग, पशुवैधकीय विभाग, शिक्षण विभाग व इतर विभागामार्फत शिबिरस्थळी स्टाल लावून योजनेचा लाभ देण्याचे काम होणार आहे. करीता जास्तीत जास्त संख्येत नागरिकांनी शिबिरस्थळी येण्याचे करावे असे आव्हाहन मुलचेऱ्याचे तहसीलदार सर्वेश मेश्राम, लगाम माल चे तलाठी रितेश चिंदमवार, लगाम चक च्या तलाठी अनिता दुर्गे यांनी केले.