टाटा समूह भारतात आयफोन १५ची निर्मिती करण्याचा करार करत आहे. म्हणजे यावेळी आयफोन १५ पूर्णपणे स्वदेशी असेल, ज्यामध्ये टाटांचा सकारात्मक सहभाग दिसून येईल. मेड इन इंडियाच्या दिशेने टाकलेले हे मोठे पाऊल मानले जात आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात मॉन्सूनचे आगमन होऊ शकते, यावर्षी राज्यात सरासरी 96 टक्के पावसाची शक्यता असणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
तेल कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण केंद्र सरकारने कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स 4,100 रुपये प्रति टनावरून शून्यावर आणला आहे, त्यामुळे आता तेल कंपन्यांना कच्च्या तेलावर कोणताही विंडफॉल कर भरावा लागणार नाही.
मातृत्व लाभ संशोधन विधेयक २०१६, २०१७ मध्ये संसदेत मंजूर करण्यात आले होते. ज्यामुळे, यापूर्वी मिळणाऱ्या ३ महिन्यांच्या मॅटर्निटी लीव्हला वाढवून ६ महिन्यांपर्यंत करण्यात आले आहे.
मात्र आता, भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघच्या महिला संघटनेनं एक विधान जारी केलं आहे. त्यामध्ये, डॉ. पॉल यांचा अहवाल देण्यात आला आहे, त्यानुसार, ‘प्रायव्हेट आणि सरकारी क्षेत्रांमधील महिलांच्या मातृत्त्व काळातील रजा ६ महिन्यांऐवजी आता ९ महिने करण्यावर विचार केला पाहिजे असं म्हटलं आहे.
पुण्याचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी पुणे जिल्ह्याचे विभाजन करून पिंपरी चिंचवड सह शिवनेरी नामक नवा जिल्हा तयार करावा अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर केली.