प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत गर्भवती व स्तनदा मातांना कुटुंबातील पहिल्या जीवित अपत्यासाठी गर्भवती व स्तनदा मातांनी काही निकष पूर्ण केल्यानंतर दोन टप्प्यात 5000/- रुपये तर दुसरी मुलगी झाल्यानंतर एका टप्प्यात 6000/- रुपयांचा लाभ थेट लाभार्थीच्या आधार संलग्न (सीडेड) बँक खात्यात जमा केला जातो.
मात्र वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना किंवा सार्वजनिक उपक्रमातील महिलांना तसेच सध्या लागू असलेल्या कोणत्याही कायद्याने समान लाभ मिळत असल्यास या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. एखाद्या लाभार्थीस दुसऱ्या गरोदरपणात जुळं/तीळं किंवा चार अपत्य झाल्यास आणि त्यापैकी एक मुलगी किंवा अधिक मुली असतील तरीदेखील दुसऱ्या मुलीसाठीचा लाभ अनुज्ञेय असणार आहे.
नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार लाभार्थीकडे लाभ घेण्यासाठी खालीलपैकी किमान एक कागदपत्र असणं आवश्यक –
1) ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न रु. 8 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.
2) अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या महिला.
3) ज्या महिला 40 टक्के किंवा पूर्णतः दिव्यांग आहेत.
4) बीपीएल शिधापत्रिका धारक महिला.
5) आयुष्मान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत महिला लाभार्थी.
6) ई-श्रम कार्ड धारण करणाऱ्या महिला.
7) किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी.
8) मनरेगा जॉब कार्ड घेतलेल्या महिला.
9) गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका (AWW) /अंगणवाडी मदतनीस (AWHs)/आशा कार्यकर्ती (ASHAs)
योजनेचा लाभ मिळण्यासाठी वरील नमूद किमान एक कागदपत्रांव्यतिरिक्त..
1) लाभार्थी आधार कार्ड.
2) परिपूर्ण भरलेले माता आणि बाल संरक्षण कार्ड.
3) लाभार्थीच्या स्वतःच्या बँक पासबुकची झेरॉक्स.
4) नवजात बालकाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र.
5) RCH नोंदणी क्रमांक देणे आवश्यक आहे.
6) मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे.
महत्वाचं: या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील आशा कार्यकर्ती, आरोग्यसेविका/सेवक, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, नागरी आरोग्य केंद्र येथे संपर्क साधावा. फॉर्म नोंदणी आणि कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर लाभार्थीची माहिती केंद्र शासनाच्या पोर्टलवर भरल्यानंतर विनाअडथळा फॉर्म मान्य झाल्यास लाभार्थीच्या बँक खात्यात थेट (DBT द्वारे) रक्कम जमा होईल