मुलचेरा: प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ ते रब्बी २०२६ हंगामासाठी ३ वर्षासाठी अधिसूचितक्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. खरीप हंगाम २०२३ मध्ये सदर योजनेतील सहभाग हा कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असून योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत खरीप हंगाम ३१ जुलै, २०२३ अशी आहे. त्यासाठी पीएमएफबीवाय हे ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. खरीप हंगाम मध्ये येणाऱ्या पिकांचा विमा काढता येईल. सन २०२३-२४ पासून ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने शेतकरी हिस्स्याची हेक्टर 900 रूपये विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल. योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित पीएमएफबीवाय पोर्टल,https://pmfby.gov.in/ व आपले सरकार सेवा केंद्र यांचे मार्फत विमा अर्ज करता येईल. योजनेतील सहभाग संदर्भात शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा.
Related Articles
एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ
ओमायक्रॉन या नवीन कोरोना विषाणूचा महाराष्ट्रात शिरकाव झाल्याने एसटी महामंडळाने खबरदारीचे पाऊल टाकत ज्येष्ठ नागरिक व इतर सवलत धारकांच्या “स्मार्ट कार्ड ” योजनेला दि.31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी दिली आहे. राज्य परिवहन सेवेतील प्रवासासाठी दि.1 एप्रिल 2022 पासून स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात […]
पारंपरिक, ऐतिहासिक वातावरणात शिवप्रतापदिन होणार साजरा – पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा, दि. 21 : यंदा 30 नोव्हेंबर रोजी किल्ले प्रतापगड येथे साजरा होणारा शिवप्रतापदिन मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरुपात साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. यंदाच्या शिवप्रतापदिनाचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्याचे सुपुत्र व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते किल्ले प्रतापगडावर भव्य असा जरीकाठी भगवा झेंडा फडकविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व ती तयारी […]
छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2022 बाबत गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी
“छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार दि. १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर हा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रजातीचे संक्रमण अद्याप सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा न करता स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन “छत्रपती शिवाजी महाराज जयंती” उत्सव […]