ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

खरीप हंगाम 2023 पीक स्पर्धा

मुलचेरा : शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यात स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य जिल्हा व तालुका पातळीवर पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादनही घेता येईल तसेच त्यातून बक्षीसही जिंकता येणार आहे. या स्पर्धेत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
*काय आहे पीक स्पर्धा?*
प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, शेतकऱ्यांचा ओढा अधिक अधिक उत्पादन काढण्याकडे असावा यासाठी कृषी विभागाच्या वतीने पीक स्पर्धा घेण्यात येते. यावर्षीही खरीप हंगामासाठी ही स्पर्धा होत आहे. तालुका,जिल्हा,विभाग आणि राज्य अशा विविध स्तरावर स्पर्धा होणार आहे.
*कोणत्या पिकासाठी स्पर्धा व कधीपर्यंत सहभाग घेता येईल….*
तालुक्यात खरीप हंगामात स्पर्धा होत आहे यासाठी मुलचेरा तालुक्यासाठी भात पीक निश्चित करण्यात आले आहे. खरीप हंगामामध्ये भात पीक स्पर्धेत सहभागासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2023 पर्यंत आहे.
*सहभागासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रवेश शुल्क*
1) विहित नमुन्यातील अर्ज
2) ठरवून दिलेले प्रवेश शुल्क
3) 7/12 व 8 अ उतारा
4) जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास)
सर्वसाधारण गटासाठी 300 रुपये व आदिवासी गटासाठी 150 रुपये प्रवेश शुल्क राहील.
*बक्षिसाची भरीव रक्कम*
तालुका पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गटात पहिले बक्षीस 5 हजार रुपये आहे,दुसरे 3 हजार व तिसरे 2 हजार रुपये आहे. त्याचबरोबर जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस 10 हजार, दुसरे 7 हजार व तिसरे 5 हजार असणार आहे. तसेच राज्य पातळीवर पहिले बक्षीस 50 हजार, दुसरे 40 हजार, तिसरे 30 हजार रुपये आहे.
शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांनी शेतीतून चांगले उत्पादन काढण्यासाठी मुलचेरा तालुक्यात खरीप हंगामात भात पीक स्पर्धा आयोजित होत आहे. यामध्ये तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. तसेच आपल्या शेतीतून चांगले उत्पादन काढावे. यासाठी कृषी विभागाचे ही सहकार्य राहील. तालुक्यातील शेतकऱ्यांनी या स्पर्धेत मुदतीत सहभागी व्हावे असे आव्हान तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री विकास पाटील यांनी शेतकरी बांधवांना केले आहे.