ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांनी सिरोंच्या येथील राजेश येलपुला यांच्या कुटुंबाला दिला आधार

अहेरी इस्टेटचे दानशूर राजे अंम्ब्रिशराव महाराज यांनी पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंच्या तालुक्यात माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम हे दौऱ्यावर आले असता स्थानिक सिरोंच्या येथील रहिवासी असलेले राजेश येलपुला यांचे काही दिवसांपूर्वी दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याचे उपचारा दरम्यान कळलं त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर खूप मोठ संकट आलं होत,घरातला कर्ताधरता राजेश येलपुला हा असल्याने कुटूंब चिंतेत होत आणि उपचारासाठी खर्च व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागणार ? हा प्रश्न त्या कुटुंबातील सदस्य यांना होता, ही बाब माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता राजेश येलपुला यांच्या घरी भेट दिली त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांची आस्थेने विचारपूस केली आणि त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेत त्यांना आधार दिला व *10000/-*( *दहा हजार*) रुपयांची आर्थिक मदत केली आणि शासनाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी राजेश येलपुला यांच्या कुटूंबाला मदत करा अशा सूचना सिरोंच्या येथील कार्यकर्ते यांना दिल्या आणि आपण सर्वतोपरी पुन्हा मदत करण्याच आश्वासन सुध्दा राजे अंम्ब्रिशराव महाराज यांनी दिल.विशेष बाब म्हणजे *”जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा”* हे ब्रीद मानून अहेरी इस्टेट चे दानशूर राजे अंम्ब्रिशराव महाराज हे अनेकदा आपल्या दानवीर स्वभावाने आपल्या जिल्ह्यातील जनतेला रोगाने ग्रासलेले, कॅन्सर ग्रस्त,अपघात ग्रस्त अशाना संकटात आणि अडचणीत सर्वोपरी मदत करीत असतात आणि त्यांनी आतापर्यंत अनेक गरजूंना मदत केली आहे आणि त्यांच्या कुटूंबाला आधार दिला आहे,
त्यावेळी भाजप तालुका अध्यक्ष शंकर नरहरी, संतोष पडलवार,संदिप राचार्लवार,कलाम हुसेन, सितापट्टी गट्ट,सतीश पदमटीटी,दिलीप शेनिगारपु,राजू पेदापल्ली,इरफान खान, तसेच सिरोंच्या येथील कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.