भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एल निनोचा प्रभाव असल्यामुळे कमी पाऊस पडत आहे. मात्र आता १३ ऑगस्टपासून राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल.
त्यानुसार कोकण भागात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
तर १५ ऑगस्टपासून सर्वत्र पाऊस पडणार असून राज्यात कमी वेळेत अधिक पावसाच्या सरी बरसणार आहेत, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.