गडचिरोली येथील गोंडवाना भवन येथे आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांचे हस्ते पार पडले, यावेळी मार्गदर्शन करतांना आपल्या न्याय हक्कांसाठी लढा देण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करण्याची गरज असून मोदी सरकारच्या खाजगीकरण धोरणाविरुद्ध सुद्धा आवाज उठविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. किरसान यांनी केले. संमेलनाचे संयोजक देवरावजी चौवारे यांनी प्रस्तावना करून अंगणवाडी व बालवाडी सेविकांच्या समस्या विदित केल्या. यावेळी संघटनेचे विविध पदाधिकारी व मोठ्या संख्येने बालवाडी व अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस उपस्थित होत्या.
Related Articles
कृषी विभागाचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना पोस्टद्वारे माती परिक्षणासाठी पाठवता येणार
गेल्या काही महिन्यांपासून हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. अशातच जून-जुलै महिन्यात कधी उन्हाच्या झळा, गुलाबी थंडी, तर कधी पावसाची रिमझिम यामुळे हवामानाचे चक्र फिरले होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने सतत हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी शेतातील पेरण्या केल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना पेरणी दरम्यान काही अडचण आल्यास किंवा बोगस बियाणांच्या घटना कमी करण्यासाठी सरकार वारंवार प्रयत्न […]
हुतात्मा दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे अभिवादन
मुंबई, दि. 30 : हुतात्मा दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज भवन येथे दोन मिनिटे मौन पाळून महात्मा गांधी तसेच हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी ‘महात्मा गांधी यांच्या राजभवन भेटी’ या विषयावरील माहितीपट दाखविण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष […]
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची कर्जमर्यादा १० लाखावरुन १५ लाख रुपये – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 01 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते. यामध्ये 10 लाखाच्या मर्यादेत असणाऱ्या कर्जावरील व्याज परतावा महामंडळामार्फत देण्यात येतो. या योजनेअंतर्गत कर्ज मर्यादेत वाढ करुन 15 लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्ज मर्यादा वाढविल्यामुळे लाभार्थींना कर्जाच्या हप्त्यांमध्ये सुलभता राहावी. म्हणून कर्ज परताव्याचा कालावधी सुद्धा 5 वर्षावरुन 7 वर्षापर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात […]