ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृवाखाली भारतीय जनता पक्षात

माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृवाखाली भारतीय जनता पक्षात

सिरोंच्या तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी केला पक्ष प्रवेश

सिरोंच्या तालुक्यात राष्ट्रवादी,आविस पक्षाला खिंडार.

गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक अहेरी विधानसभा क्षेत्रातील अनेक गावातून मोठ्या संख्येने माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली अनेक गावातून आज मोठ्या प्रमाणात तरुण कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत.

राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांनी पालकमंत्री असतांना केलेल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील विकासत्मक झालेला बदल, त्यांची विकासात्मक नवनवीन कल्पना,युवा नेतृत्व गुण, शांत संयमी स्वभाव, हे आजच्या तरुण पिढीला आकर्षनाचं ठरत आहे.
राजे अंम्ब्रिशराव आत्राम हे सिरोंच्या तालुका दौऱ्यावर आले असता, शेकडो कार्यकर्ते यांनी राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

दहीहंडी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वावर सिरोंच्या तालुक्यातील,चिट्टूर,अंकीसा,असरल्ली,रंगधामपेठा,नाडीकुडा,वडदम,बालमृत्यूपल्ली या गावातील शेकडोच्या संख्येने त्यामध्ये विद्यमान सरपंच,आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादी,आविसच्या तरुण कार्यकर्त्यांनी राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांची भेट घेतली आणि त्यांच्या युवा नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात सिरोंच्या येथील स्थानिक विश्रामगृहात पक्ष प्रवेश केला.

त्यावेळी राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांनी त्या कार्यकर्त्यांची अडचणी, तालुक्यातील असलेलले प्रश्न आणि स्थानिक समस्या विषयी त्यांच्या सोबत चर्चा केली आणि मी तुमच्या सोबत खंबीरपणे उभा आहे, तुम्ही भारतीय जनता पक्षाचे विकासात्मक धोरण शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहचविण्यासाठी मेहनत करा मी तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असे म्हणत त्यांचा आत्मविश्वास वाढवला.त्यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली …*राजे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है!*
राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांनी सिरोंच्या तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध आहो असे आश्वासन दिले, त्यावेळी सिरोंच्या तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.