ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 13 हजार कोटींच्या विश्वकर्मा योजनेला सुरुवात, 30 लाख कुटुंबांना होणार फायदा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशाला अनोखी भेट म्हणून ‘विश्वकर्मा योजनेला’ सुरुवात केली. पीएम विश्वकर्मा योजना सुमारे 13 हजार कोटी रुपयांची आहे.
 ज्यामध्ये कारागीरांना आर्थिक मदतीसाठी कर्ज दिले जाणार आहे. या कर्जावर 5 टक्के सवलतीच्या दराने व्याज आकारले जाईल. ज्यामध्ये कर्जाच्या पहिल्या हप्त्यात 1 लाख रुपये आणि दुसऱ्या हप्त्यात 2 लाख रुपये मिळतील.
 *पहा काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी*
 देशातील नागरिकांचे कौशल्य वाढवण्यासाठी या माध्यमातून प्रशिक्षणही दिले जाणार आहे. योजनेचे लाभार्थी पीएम विश्वकर्मा पोर्टलशी जोडले जातील. यामध्ये कारागिरांची मोफत नोंदणी करण्यात येणार.
 अर्ज करणाऱ्या नागरिकांचे किमान वय 18 वर्षे पूर्ण असावे, या योजनेअंतर्गत देशातील 30 लाख कुटुंबांना थेट फायदा होणार, असेही त्यांनी म्हटले आहे.