17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर “सेवा पंधरवाडा” निमित्ताने अहेरी विधानसभा क्षेत्रात मोठ्या उत्साहात सेवाभावी कार्य सुरू.
भारत देशाचे लाडके पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस हा संपूर्ण देशात 17 सप्टेंबर तें 2 ऑक्टोबर पर्यंत “सेवा पंधरवाडा”म्हणून देश भरात सेवाभावी कार्य करत साजरा करण्यात येत आहे.या निमित्ताने माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांच्या तर्फे संपूर्ण अहेरी विधानसभा क्षेत्रात मोठ्या उत्साहात सामजिक कार्य सुरू आहे.
अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध ठिकाणी रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप,रुग्णसेवा,अन्नदान,रक्तदान शिबीर, मॅरेथॉन स्पर्धा, स्वच्छता अभियान,गरजूंना आर्थिक मदत,अशा प्रकारे अनेक सेवाभावी कार्य मोठ्या उत्साहात सुरू आहेत.त्याचं निमित्ताने सिरोंचा येथील गणेश मंदिराला माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांनी दिनांक 19 सप्टेंबर रोजी गणेश मंदिरासाठी भजन सामग्री करिता 30,000/-रु आर्थिक मदत केली.
या आर्थिक मदतीतुन गणेश मंदिराला भजनासाठी तबला,पेटी,टाळ,डमरू इत्यादी साहित्य घेण्यात आले.त्यावेळी सिरोंच्या येथील गणेश भक्त व भारतीय जनता पक्ष तालुका अध्यक्ष शंकर नरहरी,जिल्हा सचिव संदीप राचार्लवार,रंगू बापन्ना, सितापट्टी गट्टू, दिलीप शेनीगारपू,सतीश पदमटिटी,श्रीधर आणकारी,रमेश मुंगीवार,नागेश ताडबोईना,सत्यनाराण आईला, राजू पेंदापल्ली,सतीश गट्टू इत्यादी कार्यकर्ते आणि गावकरी उपस्थित होते..!