एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत 11 शासकीय आश्रम शाळेमधील रिक्त *प्राथमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व उच्च माध्यमिक शिक्षक* या पदांकरिता कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यास्तव दि. 27 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. गडचिरोली जिल्ह्याच्या परिसरातील एकूण 222 बेरोजगार शिक्षित तरुणांकडून सदर पदाकरिता अर्ज प्राप्त झालेले आहेत. 222 अर्जांपैकी 35 अर्जदार अपात्र ठरले आणि उर्वरित 187 पात्र उमेदवारांची *दि. 3 ऑक्टोबर 2023 ला सकाळी 9.00 वाजता* पासून मुलाखत घेण्यात येणार असल्याचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांनी कळविले आहे. मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी प्रकल्प कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लावून प्रकाशित करण्यात आलेली आहे. मुलाखतीनंतर रिक्त पदावर गुणांनुक्रमानुसार मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात येणार आहे. त्यामुळे मुलाखतीस पात्र असणाऱ्या सर्व उमेदवारांनी *3 आक्टोंबर 2023 ला सकाळी 9.00 वाजता* प्रकल्प कार्यालय सभागृहात न चुकता उपस्थित व्हावे, अशी सूचना सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांनी दिलेली आहे.
Related Articles
राष्ट्रीय बियाणे महामंडळात 89 जागांसाठी भरती
National Seeds Corporation Limited- NSCL, India Seeds, NSC Recruitment 2020 (India Seeds Bharti 2023, NSC Bharti 2023) for 89 Junior Officer I, Management Trainee, & Trainee Posts. जाहिरात क्र.: RECTT/1NSC/2023 Total: 89 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 ज्युनियर ऑफिसर I (लीगल) 04 2 ज्युनियर ऑफिसर I (विजिलेंस) 02 3 मॅनेजमेंट ट्रेनी […]
ग्रामीण भागातुनही उत्कृष्ट खेळाडू घडतील:माजी जि प अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे
मुलचेरा:-शहरी भागात खेळाडूंसाठी प्रशिक्षकांसह सर्व सोयीसुविधा उपलब्ध असतात त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडू शहरी भागातील खेळाडूंच्या तुलनेत थोडे कमी पडतात.जर ग्रामीण भागातील खेळाडूंना सर्व सोयीसुविधा, योग्य प्रशिक्षण दिल्यास ग्रामीण भागातूनही उत्कृष्ट खेळाडू घडतील असे प्रतिपादन माजी जि प अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी केले.ते मुलचेरा तालुक्यातील श्रीनगर येथे आयोजित भव्य फुटबॉल स्पर्धेचे मुख्य बक्षीस वितरक म्हणून बोलत […]
मंत्रिमंडळ बैठक
मुंबईतील भांडवली मूल्याधारित मालमत्ता दर यावर्षी न बदलण्याचा निर्णय कोविडमुळे झालेल्या विपरीत परिणामांमुळे मुंबईतील भांडवली मूल्याधारित मालमत्ता दर सध्या म्हणजे २०२२-२३ करिता न सुधारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याप्रमाणे मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ मधील कलम १५४(1ड) मध्ये सुधारणा करण्यात येईल. कोविडमुळे लागू केलेल्या टाळेबंदी तसेच प्रादुर्भावाच्या […]