ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शेतकऱ्यांच्या खात्यात या रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा १ ला हप्ता जमा होणार !

महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतील पहिल्या हप्त्याचे वितरण गुरुवारी 26 ऑक्टोबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हा हप्ता वितरण होईल. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ उपस्थित राहील.

प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजनेतील पहिल्या हप्त्यापोटी 1720 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. याबाबतचा शासन निर्णय 10-10-2023 रोजी निर्गमित झाला आहे.

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana 1st Installment Update : शेतकऱ्यांच्या खात्यात 26 ऑक्टोबर २०२३ रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा १ ला हप्ता जमा होणार !:

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून मिळणार वर्षाकाठी 6 हजार रुपये मिळणार आहे. एप्रिल ते जुलै 2023 कालावधीसाठी पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून वर्षाला एकूण 12 हजार रुपये मिळणार आहेत.

नमो शेतकरी महा सन्मान निधी नेमका काय? (What is NAMO Shetkari Maha Sanman Nidhi)

  • नमो शेतकरी महा सन्मान निधी ही केंद्राच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसारखीच योजना आहे.
  • या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महाराष्ट्र सरकार वर्षाला सहा हजार रुपये जमा करेल.
  • केंद्र सरकारकडून दर तीन महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात.
  • याप्रमाणेच आता राज्य सरकारही दर तीन महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करेल.
  • यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला केंद्राचे सहा हजार आणि महाराष्ट्र सरकारचे सहा हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये जमा होतील.