तुम्हाला माहिती असेल, अनेकदा आपण सण, वाढदिवस किंवा कोणत्याही शुभ प्रसंगी एका किंवा दुसर्या शहरात राहणारे मित्र, कुटुंब आणि नातेवाईक यांना गिफ्ट पार्सल पाठवतो. पण अनेक वेळा चुकीच्या पॅकिंगमुळे माल खराब होतो.
मात्र, आता भारतीय टपाल विभागाने यासंदर्भात निर्णय घेत ग्राहकांसाठी मोठी ऑफर दिली आहे. भारतीय टपाल विभागाने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे.
पहा कशी आहे हि सुविधा
पार्सल पाठवतांना बुकिंगसाठी येणाऱ्या ग्राहकांना टपाल विभागाकडून पार्सल पॅकिंगची सुविधा देण्यात येत आहे. जनरल पोस्ट ऑफिस म्हणजेच जीपीओ ऑफिसमध्ये ही व्यवस्था करण्यात आली आहे.
ही सुविधा ग्राहकांच्या खूप पसंतीस पडत असून दुसरीकडे विभागाचे उत्पन्नही वाढले असल्याची माहिती टपाल खात्याच्या अधिकाऱ्याने दिली आहे.