शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी भारत सरकार आणि राज्य सरकार विविध योजना राबवित असतात. अशातच केंद्र सरकारने पीएम मत्स्य संपदा योजना राबवली आहे. मत्स्य पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. भारतातील मत्स्यपालनाला चालना देण्याच्या उद्देशाने शासनाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू केली आहे.
केंद्र सरकारने या योजनेला ब्ल्यू रिव्होल्युशन असे नाव दिले आहे. या योजनेअंतर्गत मत्स्य शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून 3 लाख रुपयांचे कर्ज दिले जात आहे. शासना पायाभूत सुविधा उभारण्यासाठी हा निधी देत आहे. तसेच यामधून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
पीएम मत्स्य संपदा योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना लेख विभाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. केंद्र सरकारचा ही योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश देशातील मत्स्य व्यवसायाला चालना देणे हा आहे.