केंद्र सरकारने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक अनोखी योजना आणली आहे. ‘नई रोशनी योजना’ असे या योजनेचं नाव आहे.
या योजनेत जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन केंद्र सरकारने केले आहे.
पहा कशी आहे हि योजना
या योजनेमार्फत महिलांना विविध गोष्टींचे ज्ञान दिले जाणार आहे. जसे कि, बँकिंग, ऑनलाईन पेमेंट, संवाद अशा विविध गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. यामुळे महिलांना समाजात वावरताना कोणत्याही गोष्टीत अडथळा राहणार नाही.
आपल्या अडचणी त्या स्वतः सोडवू शकतील. दैनंदिन जीवनातील व्यावहारिक ज्ञान, स्वच्छ भारत, वैद्यकीय, राजकीय, महिलांसाठी असलेले अधिकार या सर्वच गोष्टींची माहिती दिली जाणार आहे. यासह महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदत केली जाणार आहे.
कोणाला मिळणार या योजनेचा लाभ
▪️ या योजनेत अपंग महिलांना देखील संधी दिली जाणार आहे. 75 टक्के गरीब कुटुंबातील महिलांना यात प्राधान्य आहे. अन्य वर्गातील महिलांसाठी 25 टक्के प्राधान्य देण्यात येईल.
▪️ या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला nairoshni-moma.gov.in या संकेस्थळावर भेट द्यावी लागेल. तेथे रजिस्टेशन करावे लागेल. विचारलेली माहिती भरल्यानंतर एक OTP येईल. त्यानंतर तुमचे राजिस्टेशन झाल्यावर लॉगिन करून फॉर्म सबमिट करावा लागेल.