विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारात आता आठवड्यातून एकदा अंडी आणि केळीचा समावेश करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून सकस आणि पौष्टिक आहार देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
*पहा काय सांगितले शिक्षण विभागाने*
राज्याच्या शिक्षण विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या पोषण आहार योजनेनुसार, विद्यार्थ्यांना नियमित आहाराव्यतिरिक्त आठवड्यातून एक दिवस अंडी देण्यात येणार आहेत.
तसेच जे विद्यार्थी अंडी खात नाहीत त्यांना केळी दिली जाणार या निर्णयानुसार शालेय विद्यार्थ्यांना बुधवारी किंवा शुक्रवारी उकडलेले अंडे अथवा अंडा पुलाव, बिर्याणी अशा स्वरूपात आहार देण्यात येईल.