गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

अहेरी येथे शहीद क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त भव्य सामूहिक विवाह सोहळा संपन्न

मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा पुढाकार

आदिवासी समाज विविधतेतून एकतेची उंची गाठतो- माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे प्रतिपादन

अहेरी- आदिवासींच्या जनजातीय संस्कृतिची एकसंघता म्हणजे आदिवासी समाज विविधतेतून एकतेची उंची गाठत असल्याची प्रतिक्रिया समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यातील कार्यक्रमात उदघाटक म्हणून माजी राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.अम्ब्रिशराव महाराज यांनी व्यक्त केली.

शहीद क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त कै. राजे विश्वेश्वराव महाराज स्टेडियमच्या मैदानात सल्ला गांगरा शक्ती स्थापना, कोयापुणेम प्रभोधन व ६१ आदिवासी बांधवांच्या सामूहिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी ते बोलत होते. आदिवासी बांधवानी जल, जमीन, जंगल मालकी जोपासून त्यांनी आपल्या मुलांना शिक्षित बनविण्याचे प्राथमिकता लक्षात घ्यावी असे आवाहन यावेळी मा.धर्मराव बाबा आत्राम यांनी अध्यक्षस्थानावरून केले. अहेरी उपविभागातील आलेल्या ६१ आदिवासी जोडप्याचा विवाह सोहळा यावेळी पार पडला. त्यांना गृहपयोगी वस्तू,कपडे, सिलिग फॅन, व इतर बाबीचे राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

सामूहिक विवाह सोहळा व प्रभोधन कार्यक्रमाला हर्षवर्धनराव बाबा आत्राम, नगराध्यक्षा कु.रोजा करपेत,पोलीस निरीक्षक किशोर मानभाव,आदिवासी एम्प्लॉयज फेडरेशनचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.रमेश हलामी, शाहीन हकीम, बबलू हकीम,दशरथ कोरेत, उपस्थित होते.व आदिवासी समाजाचे प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व समाजातील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.