प्रत्येक घरापर्यंत व घरातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत लाभ पोहचविण्यासाठी दाखल्यांची जत्रा कार्यक्रमाचे शासनाकडून आयोजन : सर्वेश मेश्राम तहसिलदार मूलचेरा
मूलचेरा तालुक्यातील आदिवासी बहुल व दुर्गम भाग असलेल्या मौजा देवदा येथे तालुका प्रशासनाकडून दाखल्यांची जत्रा व भव्य महाराजस्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
या कार्यक्रमाला उदघाटक माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री उत्तमराव तोडसाम उप विभागीय अधिकारी चामोर्शी हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे श्री सर्वेश मेश्राम तहसिलदार मूलचेरा,श्री जुवारे साहेब गट विकास अधिकारी, श्री विकास पाटील तालुका कृषी अधिकारी,दर्शने साहेब पीएसआय बोलेपल्ली,परिविक्षाधीन तहसिलदार करिश्मा चौधरी,राजेश तलांडे नायब तहसिलदार,युधिष्ठिर बिस्वास माजी बांधकाम सभापती जि प गडचिरोली, श्री केशरी पाटील तेलामी सरपंच देवदा, श्री गणेश हलामी सरपंच बोलेपल्ली, श्री नरेश कांदो सरपंच वेंगनुर, मारोती पल्लो, वनिताताई तिम्मा,संतोष तुमरेटी, शेख सर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, शेतकरी प्रमाणपत्र, जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, ई श्रम कार्ड,संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा योजना,कृषी विभागाकडून ट्रॅक्टर वाटप, जमिनीच्या आरोग्यपत्रिका,आरोग्य विभागाकडून आरोग्य तपासणी, व इतर प्रमाणपत्र असे एकूण 3097 प्रमाणपत्रांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना करण्यात आले.या वेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना समयोचित मार्गदर्शन केले. विवीध विभागाचे स्टॉल कार्यक्रम स्थळी लावून शासनाच्या योजना नागरिकांना देण्यात आल्या.शाळेच्या विद्यार्थ्यांनी सामुहिक रेला नृत्य करुन उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन रितेश चिंदंमवार तलाठी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी करण्याकरिता युवराज भांडेकर मंडळ अधिकारी मूलचेरा, कु रसुला उसेंडी तलाठी, प्रशांत मेश्राम तलाठी,रमेश टिंगूसले ग्रामसेवक, पुरण चांदेकर, अर्जुन कांदो, विनोद गोटा व समस्त गावकरी देवदा , बोलेपल्ली, वेंगनुर ग्राम पंचायत मधील रहिवासी यांनी मोलाचे सहकार्य केले.