दिनांक 6 ऑक्टोबर रोजी पोलीस दादालोरा खिडकी च्या माध्यमातून गडचिरोली चे पोलीस अधीक्षक निलोत्पल सा. अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन ) M रमेश सा अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान ) यतिश देशमुख सा अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा सर (अहेरी ) उपविभागिय पोलीस अधिकारी सिरोंचा संदेश नाईक सा यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोस्टे झिंगानूर येथे भव्य जनआरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या उदघाटक म्हणून झिंगानूर गावाच्या प्रथम नागरिक निलिमा ताई मढावि तसेच अध्यक्ष उपपोलीस स्टेशन झिंगानूर चे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अभिजीत तुतूरवाड यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून उपपोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र वंगाटे सा. श्रेणी पोलीस उपनिरीक्षक कस्तुरवार सा रा. रा. पो. ब दौंड चे पोलीस उपनिरीक्षक ठोंबरे साहेब पोलीस उपनिरीक्षक जाधव साहेब तसेच गावातील प्रतिष्टीत नागरिक सिरीया मढावि दासू मढावि पोचाजि मढावि पेंटा कुळमेथे भारत मढावी पत्रकार रामचंद्र कुमरी तसेच कोपेला चे सरपंच सुरेश जंगम यांची प्रमुख उपस्थिती होती
बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली उपपोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र वंगाटे सा यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना पोलीस दादालोरा खिडकी च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले तदनंतर प्राथमिक आरोग्य केंद्र झिंगानूर येथील उपस्थित CCHO माधुरी निंबाळकर मॅडम मेश्राम मॅडम मढावि मॅडम आणि इतर स्टाफ यांनी उपस्थित नागरिक महिला यांची आरोग्य तपासणी केली अध्यक्षीय समारोप करताना उपपोलीस स्टेशन झिंगानूर चे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अभिजीत तुतूरवाड यांनी गडचिरोली पोलीस दलातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेबद्दल माहिती दिली तसेच आगामी पोलीस भरती आणि विविध स्पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित महिला पुरुष विध्यार्थी यांना पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून विविध लोकोउपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस शिपाई प्रफुल्ल चहारे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपपोलीस स्टेशन चे प्रभारि अधिकारी अभिजीत तुतूरवाड सा पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र वंगाटे सा. रा रा पो ब दौंड चे पोलीस उपनिरीक्षक ठोंबरे साहेब पोलीस उपनिरीक्षक जाधव सा कस्तुरवार साहेब तसेच सर्व जिल्हा पोलीस अंमलदार आणि राज्य राखीव पोलीस बल दौड यांचे सर्व अधिकारी अंमलदार यांनी सहकार्य केले